-    कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने सर्वत्र या युद्धाच्या वेळच्या आठवणी जागवल्या जात असून, भारतीय सैन्यदलातील शहिदांना मानवंदना दिली जात आहे. 'सैनिक हो तुमच्यासाठी', असं म्हणत नेमकं या युद्धाच्या वेळी काय परिस्थिती होती, त्यावरही प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'च्या आर्काइव्हमधूनही या युद्धादरम्यानचे काही दुर्मिळ फोटो आम्ही तुमच्या भेटीला आणले आहेत. चला तर मग, पुन्हा डोकावूया त्या काळात…. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ह्ज) 
-    कारगिल युद्धाच्या वेळी जनरल व्ही.पी. सिंग भारतीय सैन्यदलाचे प्रमुख होते. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ह्ज) 
-    भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरु होते. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ह्ज) 
-    भारतीय सैन्यदलातील जवान राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने फडकवताना. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ह्ज) 
-    कारगिलच्या युद्धादरम्यान बोफोर्सची महत्त्वाची भूमिका ठरली होती. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ह्ज) 
-    कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोकण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने ऑप्रेशन विजयची सुरुवात केली. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ह्ज)) 
-    युद्धादरम्यानच्या काही फोटोंच्या प्रदर्शनादरम्यान एका वयोवृद्ध महिलेला अश्रू अनावर झाले होते. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ह्ज) 
-    कारगिल युद्धात शहिद झालेल्या जवानांसाठी जनसामान्यांनी पुढे येत शक्य त्या सर्व परिंनी त्यांची मदत केली होती. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ह्ज) 
-    कारगिलच्या युद्धात वापरलेले शक्तिमान ट्रक नाशिकवरुन वसईमार्गे परत आले तेव्हाची ही क्षणचित्रे. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ह्ज) 
-    शत्रूवर मारा करताना भारतीय सैन्यदलाने मोठं साहस दाखवलं होतं. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ह्ज) 
-    कारगिल युद्धादरम्यान तिथे असणारी गावंच्या गावं उध्वस्त झाली होती. युद्धाच्या अशाच आठवणींपैकी एक म्हणजे बॉम्बशेल. हुंदेरमन येथे अशाच एका घरावरील हे बॉम्बशेल दाखवताना स्थानिक महिला. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ह्ज) 
 
  PM Modi on Sanjay Raut: संजय राऊत यांच्या गंभीर आजाराच्या पोस्टवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रार्थना करतो की…” 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  