-
५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मंदिर उभारणीला सुरुवात होईल. दरम्यान, भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरु आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणं नव्या रुपात-ढंगात सजली आहेत. यात आता आणखी एका ठिकाणाची भर पडणार आहे, ती म्हणजे रेल्वे स्टेशनटी . (सर्व फोटो – पीयूष गोयल ट्विटर)
-
आता अयोध्येच्या रेल्वे स्टेशनचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. राम मंदिराच्या प्रतिकृतीच्या रुपात या रेल्वे स्टेशनची पुनर्बांधणी केली जाणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयानं निधीमध्येही भरघोस वाढही करण्यात आली आहे.
-
प्रत्यक्ष राम मंदिर तयार होण्यापूर्वीच पुढील दोन वर्षात अयोध्यावासियांना मंदिराच्या प्रतिकृती स्वरुपात रेल्वे स्टेशन मिळणार आहे. या स्टेशनच्या पुनर्विकासासाठी रेल्वेने बजेटमध्ये वाढ केली असून ८० कोटींवरुन ती १०४ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.
-
सध्याचं अयोध्या स्टेशनची रचना ही देखील मंदिराप्रमाणेच आहे. काही वर्षांपूर्वीच त्याच्या पुनर्विकासाचा निर्णय झाला होता. त्यानंतर आता याचं नवं डिझाईन नव्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये प्रवाशांच्या सोयीसुविधांबरोबरच मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी हाताळण्यासाठी क्षमताही वाढवण्यात येणार आहेत.
-
या रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास दोन टप्प्यात केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात स्टेशनमधील प्लॅटफॉर्मचा भाग विकसित केला जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात स्टेशनच्या नव्या इमारतीचं बांधकाम सुरु होईल. यामध्ये अनेक टॉयलेट्स, डॉर्मिटरीज, तिकीट खिडक्या आणि मोकळी जागा असणार आहे.
जेमिमा रॉड्रिग्ज… गतवर्षी धार्मिक वादात; आता गौरवमूर्ती!