-
पुणे, पिपरी चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील हॉटेल, दुकाने, मॉल आणि चित्रपटगृहे दिवसभर ५० टक्के क्षमतेने चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी मागील काही दिवसांपासून करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे शहरातील अनेक मॉल्समध्ये साफसफाईसंदर्भात विशेष काळजी घेतली जात आहे. (सर्व फोटो : आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)
-
अनेक मॉलमध्ये अतिरिक्त साफसफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
-
रोज मॉल सुरु होण्याआधी आणि बंद झाल्यानंतर दोन वेळा सॅनिटायझेशन आणि इतर साफसफाईची काम केली जात आहेत.
-
अनेक ठिकाणी तर पीपीई कीट घालून साफई कर्मचारी काम करत आहेत.
-
यासाठी या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आलं आहे.
-
डिसइनफेक्टंट, सॅनिटायझरची फवारणी करण्यावर भर दिला जातोय.
-
मॉलमध्ये सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या ठिकाणी विशेष साफसफाई केली जात आहे.
-
एस्किलेटर्सही सॅनिटाइज केले जात आहेत.
-
मॉलमधील वर्दळ वाढण्याआधीच ही साफसफाईची कामं पूर्ण केली जात आहेत.
-
साफसफाई करताना कर्मचाऱ्यांनी कोणती दक्षता घ्यावी यासंदर्भातील नियम कठोर करण्यात आले आहेत.
-
काम योग्य पद्धतीने होत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी सुपवायझर्सचीही नेमणुक अनेक ठिकाणी करण्यात आलीय.
-
मॉलमधील दुकाने ५० टक्के क्षमतेने चालवण्याचे आदेश असले तरी मॉल प्रशासनाकडून पूर्ण खबरदारी घेतील जातेय.

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”