-
शरद पवार हे नाव महाराष्ट्रपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. देशाच्या राजकारणातही शरद पवारांचं नाव आदरानं घेतलं जातं.
-
राजकारणात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या पवारांचा हाच वारसा त्यांची कन्या सुप्रिया सुळे पुढे घेऊन जात आहेत.
-
शरद पवार यांनी राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना राजकारणात पदार्पण करताना अडचणी आल्या नाहीत.
-
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या राजकीय कारकीर्दीतील महत्त्वाचा फरक म्हणजे शरद पवारांची विधानसभेतून राजकारणाला सुरूवात केली. तर सुप्रिया सुळे यांनी थेट संसदेतूनच राजकारणाला सुरूवात केली.
-
शरद पवार पूर्णवेळ राजकारणात असले तरी त्यांची आई प्रतिभा पवार यांनी स्वतःला राजकारणापासून कायम वेगळं ठेवलं.
-
सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील जय हिंद महाविद्यालायतून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी सुक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) या विषयात पदवी घेतली.
-
याच काळात सुप्रिया पवार यांचा सदानंद भालचंद्र सुळे यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर त्या कॅलिफॉर्नियात वास्तव्याला होत्या. याच काळात त्यांनी जल प्रदूषण या विषयाचा अभ्यास केला.
-
२००६पर्यंत सुप्रिया सुळे सक्रिय राजकारणापासून दूर होत्या. शरद पवारांची मुलगी यापलिकडं त्यांची राजकारणात फारशी ओळख नव्हती.
-
२००६मध्ये पहिल्यांदा सुप्रिया सुळे यांचं नाव राजकारणात चर्चेत आलं.
-
राज्यसभेच्या रिक्त जागापैकी एका जागेवर सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या.
-
सुप्रिया सुळे यांच्या राज्यसभेच्या निवडणुकीचा एक किस्सा शरद पवार नेहमी सांगतात. त्यांच्या आत्मचरित्रातही ही गोष्ट त्यांनी नमूद केलेली आहे.
-
सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या वतीनं उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविरोधात भाजपा-शिवसेना युतीच्या वतीनं उमेदवार दिला जाणार होता.
-
युतीचे निर्णय त्यावेळी 'मातोश्री'वर व्हायचे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणतील तोच निर्णय इतका दबदबा बाळासाहेबांचा होता.
-
निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवार बाळासाहेबांना भेटायला गेले. त्यांनी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देत असल्याचं बाळासाहेबांना सांगितलं.
-
बाळासाहेब म्हणाले, मग शिवसेना उमेदवारी देणार नाही. मध्येच शरद पवार म्हणाले, 'पण भाजपाचं काय?' बाळासाहेब म्हणाले, 'कमळाबाईची चिंता नको करू, कमळाबाईला कसं पटवायचं ते मला माहिती आहे,' असा शब्द बाळासाहेबांनी दिला. सुप्रिया सुळे बिनविरोध निवडून आल्या.
-
तेव्हापासून सुप्रिया सुळे यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थानं सुरूवात झाली.
-
सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका निभावली.
-
राज्यातील युवतींना पक्षासोबत जोडण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवती काँग्रेस सुरू करण्यात आली.
-
राज्यात होणाऱ्या स्त्री-भ्रूण हत्यांविरोधात सुप्रिया सुळे भूमिका घेतली. याविरोधात त्यांनी राज्यभर अभियान चालवलं.
-
शरद पवारांना लोकांमध्ये फिरायला स्वतःला त्यांच्याशी जोडून घ्यायला आवडत. यातूनच त्यांनी पक्ष राज्यभर नेला. वडिलांचा हा गुण सुप्रिया सुळे यांनीही घेतला आहे.
-
कार्यक्रमांना हजर राहणं, वडिलधाऱ्यांसोबतच नव्या पिढीशीही त्यांनी स्वतःला संवादाच्या माध्यमातून जोडून घेतलं आहे.
-
सुप्रिया सुळे आपल्या परिवारासोबत.
-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या सोबत सुप्रिया सुळे.
-
सुप्रिया सुळे आपल्या परिवारासोबत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे / इन्स्टाग्राम)

शेतकऱ्यांनो सावधान! एकाच वेळी समोर आली ५२ अतिविषारी घोणस जातीची पिल्ले; शेतकऱ्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल