-
इस्रायलच्या ‘एनएसओ’ संस्थेने तयार केलेल्या पेगॅसस या स्पायवेअरचा वापर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासह सध्याच्या १४ राष्ट्रप्रमुखांवर पाळत ठेवण्यासाठी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
-
एनएसओ समूहाने तयार केलेले हे स्पायवेअर संबंधित व्यक्तीच्या मोबाइलमधील संभाषण, संदेश व इतर सगळी माहिती उघड करीत असते.
-
मॅक्रॉन यांच्यासह १४ जणांचे मोबाइल फोन हॅक करण्यात आले होते. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे सरचिटणीस अॅग्नेस कॉलामार्ड यांनी सांगितले, की ही अतिशय धक्कादायक बाब असून त्यामुळे जागतिक नेत्यांना धक्का बसला आहे.
-
पन्नास हजार फोनमधील माहिती या स्पायवेअरच्या मदतीने उघड करण्यात आली आहे.
-
पॅरिस येथील ‘फॉरबिडन स्टोरीज’ या संस्थेने हा प्रकार उघडकीस आणला असून आहे. या अहवालानुसार जगभरातील १० पंतप्रधान, ३ राष्ट्राध्यक्ष आणि एका राजाचा फोन हॅक करण्यात आलाय. ‘दी वॉशिंग्टन पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार या यादीत कोणाची नावं आहेत पाहूयात…
-
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन
-
दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामफोसा
-
इराकचे राष्ट्राध्यक्ष बरहाम सलिह
-
मोरोक्कोचे राजे महंमद-सहावे
-
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान
-
इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबोली
-
मोरोक्कोचे पंतप्रधान साद एडिन ओथमानी
-
लेबेनॉनचे माजी पंतप्रधान साद हारीरी
-
चार्ल्स मायकल बेल्जियमचे माजी अध्यक्ष (सध्या युरोपीयन काऊन्सीलचे अध्यक्ष)
-
मॅक्सिकोचे माजी अध्यक्ष फिलीप कॅल्डेरोन
-
या राष्ट्रप्रमुखांनी त्यांचे मोेबाइल फोन तपासणीसाठी दिलेले नाहीत.
-
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांचाही या यादीमध्ये समावेश आहे.
-
एनएसओचे पेगॅसस हे स्पायवेअर लष्करी दर्जाचे असून जागतिक माध्यम समूहाच्या १६ सदस्यांनी हा प्रकार उघड केला होता.
-
२०१९ मध्ये मॅक्रॉन यांच्यासह मंत्रिमंडळातील पंधरा जण या स्पायवेअरच्या हिटलिस्टवर होते, असे ‘ल माँद’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.
-
पॅरिसच्या अभियोक्ता कार्यालयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
-
अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस या कंपनीने एनएसओला यात डिजिटल ओशनच्या माध्यमातून सर्व्हर्सची मदत केली होती.
-
डिजिटल ओशन या कंपनीने आरोप फेटाळले किंवा स्वीकारलेले नाहीत, असे असोसिएटेड प्रेसने म्हटले आहे. (फोटो सौजन्य : रॉयटर्स, द इंडियन एक्सप्रेस आणि पिक्साबेवरुन साभार)

रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीजवळ सिंह आला अन् वास घेत पुढे केलं असं काही की…; VIDEO पाहून भरेल धडकी