-
आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर तो तुरुंगात आहे. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असून एनसीबीसह या संपूर्ण प्रकरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याच दरम्यान एनसीबीचा पंच असलेल्या प्रभाकर साईलने माध्यमांसमोर येत अनेक खुलासे केले आहेत.
-
प्रभाकर साईल हा किरण गोसावीचा सुरक्षा रक्षक आहे. साईलने यावेळी काही व्हिडीओ देखील पुरावे म्हणून दाखवले होते, यामध्ये किरण गोसावी हा आर्यन खानच्या शेजारी बसून होता. तसेच त्याने त्याच्या फोनवरून आर्यन खानचं बोलणं करवून दिलं होतं. याप्रकरणी केपी गोसावीने महत्वाचा खुलासा केला आहे.
-
किरण गोसावीने ‘आज तक’ सोबत बोलतांना अनेक खुलासे केले आहेत. जाणून घेऊया काय म्हणाला किरण गोसावी…
-
मी समीर वानखेडे यांना ओळखत नाही. मी त्यांना फक्त टीव्हीवर पाहिले आहे. मी एनसीबीच्या मागील कोणत्याही छाप्याचा किंवा कारवाईचा भाग नव्हतो.
-
सगळ्या गोष्टी वाचून मी पंचनाम्यावर सही केली होती. आर्यन खानने मला त्याच्या मॅनेजरशी बोलण्यास सांगितले होते, कारण त्याच्याकडे फोन नव्हता. माझ्याकडे फोन होता, आर्यनने मला त्याच्या मॅनेजरशी किंवा पालकांशी बोलण्याची विनंती केली होती.
-
मी प्रभाकरला ओळखतो, त्याने माझ्यासाठी काम केले आहे, पण मला त्याने केलेल्या आरोपांची माहिती नाही. ११ ऑक्टोबरपासून मी प्रभाकरच्या संपर्कात नाही.
-
माझ्यावर पुण्यात एकच जुना गुन्हा दाखल झाला होता, पण अचानक त्या जुन्या केसवर काम सुरू झालं. माझा शोध घेण्यासाठी नोटीस काढण्यात आली.
-
माझ्या जीवाला धोका आहे. मला तुरुंगात मारले जाईल, अशी धमकीही देण्यात आली आहे. मी ६ ऑक्टोबरनंतर समीर वानखेडे यांच्याशी बोललो नाही.
-
मी जहाजावर मुनमुन धमेचाच्या पंचनाम्यावर सही केली होती. तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कार्यालयात देखील एका पंचनाम्यावर सही केली होती. मी सही केलेल्या कागदावर १० लोकांची नावे होती.
-
मला NCB बद्दल काहीच कल्पना नव्हती. आर्यनने कुटुंबातील सदस्यांचा नंबर दिला नाही त्याने मॅनेजर पूजाचा नंबर दिला होता. पूजाने फोन उचलला नाही म्हणून मी तिच्याशी बोलने झाले नव्हते.

Israel-Iran Conflict : इराणवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलच्या पंतप्रधानांचा मोदींना फोन, नेमकी काय झाली चर्चा?