-
माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना सोमवारी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान केले.
-
सुषमा स्वराज यांच्या कन्या बन्सुरी स्वराज यांनी त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
-
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आदी उपस्थित होते.
-
सुषमा स्वराज यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सर्व सरकारांमध्ये मंत्री म्हणून काम केले आणि विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली.
-
सुषमा स्वराज १९९८ मध्ये अल्प कालावधीसाठी दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या.
-
तसेच त्या मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये परराष्ट्र मंत्री होत्या.
-
सुषमा स्वराज यांचं ६ ऑगस्ट २०१९ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने एम्समध्ये निधन झालं.
-
त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती.
-
पद्म पुरस्कार हा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केल्या जाणार्या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे.
-
पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जातात.
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…