-
जगभरामध्ये सध्या ओमायक्रॉन या करोनाच्या नवीन विषाणूची दहशत दिसून येत आहे.
-
दक्षिण आफ्रिकेमधील नऊ पैकी सात राज्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढली असून जगभरामध्ये जवळजवळ ४० देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत.
-
मागील दोन दिवसांमध्ये २३ देशांमध्ये करोनाच्या या नव्या विषाणूने शिरकाव केलाय.
-
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांमधील करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं चित्र दिसत आहे.
-
अनेक देशांमध्ये लॉकडाउन किंवा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
-
युरोपबरोबरच पाश्चिमात्य देशांमधील नाताळाच्या उत्सहावर करोनाच्या या नवीन विषाणूचं सावट दिसून येत आहे.
ब्राझीलमधील ३१ डिसेंबरचा उत्सव यंदाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर दुसरीकडे बेल्जियममध्ये करोना रुग्णांना बेड मिळणंही कठीण झाल्याचं चित्र दिसत आहे. -
बेल्जियममधील सहा वर्षांवरील सर्व मुलांना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आलाय.
-
देशामधील प्राथमिक शाळा २० डिसेंबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तर माध्यमिक शाळा दिवसाआड सुरु राहणार आहेत.
-
तिकडे ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १६० वर पोहचली आहे.
-
परदेशामधून आलेल्या नागरिकांना विलगीकरण बंधनकारक करण्यात आलं असलं तरी विलगीकरणासाठी हॉटेल्स उपलब्ध नसल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झालीय.
-
ब्रिटनमध्ये लसीकरण बंधनकारक करण्यात आलं असून सार्वजनिक ठिकाणी लसीकरण न झालेल्यांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाचं ब्रिटनमधील नागरिकांनी स्वागत केलंय.
-
मात्र त्याचवेळी स्पेनमध्ये करोनाचे नवे निर्बंध आणि लसीकरणाच्या सक्तीविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे.
-
ब्रिटन आणि अमेरिकेने देशात येणाऱ्या सर्व प्रवाशांना करोना चाचणीचा निकाल नकारात्मक असणं बंधनकारक केलं आहे.
-
सर्वच विमानतळांवर करोना चाचण्यांची सोय उपलब्ध करुन देण्यात आलीय.
-
अमेरिकेमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनचे २० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
-
ब्रिटनने १२ वर्षांवरील सर्व प्रवाशांना पीसीआर चाचणी बंधनकारक केलीय.
-
फ्रान्समध्ये शुक्रवारी करोनाचे ५१ हजार ६२४ रुग्ण आढळून आले आहेत. येथील करोना रुग्णांच्या संख्येत एका आठवड्यात ६० टक्क्यांनी वाढ झाल्याने सरकारी यंत्रणांची झोप उडालीय.
-
आरोग्य विभागाने सोमवारी म्हणजेच आज तातडीची बैठक बेलावली आहे. यामध्ये करोना संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबद्दल चर्चा केली जाणार आहे.
-
फ्रान्सने खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत एक कोटी लोकांना बूस्टर डोस दिलाय. जगभरामध्ये ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरु असून लहान मुलांना होणाऱ्या संसर्गाबद्दल संभ्रम कायम आहे.
-
बेल्जियममध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लागू केलेल्या निर्बंधांना विरोध केला जातोय. या निर्बंधांना विरोध करणाऱ्यांनी हिंसा केल्याच्या घटना समोर आल्यात.
-
आंदोलनकर्त्यांनी दगडफेक आणि फटके फोडून विरोध दर्शवला आहे.
-
पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या आणि लाठीचार्जच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण मिळवलं आहे.
-
जगभरामधील वेगवेगळ्या देशांमध्ये आता लोकांनी लॉकडाऊन आणि निर्बंधांना विरोध करण्यास सुरुवात केलीय.
-
अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने होताना दिसत आहेत. मात्र एकीकडे आंदोलने सुरु असताना दुसरीकडे रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकारे कठोर निर्णय घेण्यासंदर्भात ठाम दिसत आहेत.
-
इटलीमध्येही रोज १४ ते १५ हजार करोना रुग्ण आढळून येत आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत हा आकडा १५ टक्क्यांनी अधिक आहे. कमी वयोगटातील करोनाबाधितांची संख्या जगभरामध्ये वाढतानाचं चित्र दिसतंय.
-
ऑस्ट्रेलियामध्येही लस समर्थक आणि विरोधकांनी आमने-सामने येऊन आंदोलन केल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
-
करोनाचा हा ओमायक्रॉन हा नवीन विषाणू आतापर्यंत ३८ देशांमध्ये पसरला आहे.
-
मात्र दिलासादायक वृत्त असं आहे की या विषाणूचा संसर्ग झाल्याने अद्याप एकाही व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद नसल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे.
-
फार जास्त प्रमाणात म्युटेशन म्हणजेच रचनेमध्ये बदल होणारा हा विषाणू नक्की किती धोकादायक आहे याची माहिती मिळण्यासाठी अनेक आठवडे जातील असं जागतिक आरोग्य संघटनेचे आप्तकालीन परिस्थितीसंदर्भातील निर्देशक मायकल रायन यांनी म्हटलंय. (सर्व फोटो सौजन्य: रॉयटर्स, एपी)

Indian Woman : भारतीय तरुणीने दाखवलं कॅनडातल्या रोजगाराचं वास्तव, म्हणाली, “ज्यांना वाटतं इथे नोकऱ्या आहेत त्यांनी…”