-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
-
शरद पवारांची ८१ वर्ष पूर्ण झाली त्यावेळी सहस्त्रचंद्र दर्शन असा सोहळा आपण साजरा करतो.
-
पण मला असे वाटते की, राजकारणामध्ये महाराष्ट्र गेली ६० वर्ष शरदचंद्र दर्शन करतोय
-
६० वर्षे राजकारणामध्ये सातत्य ठेवणे ही सोपी गोष्ट नाही
-
मी त्यांना फोनवरुनही शुभेच्छा दिल्या असेही राज ठाकरे म्हणाले.
-
ज्याप्रकारे या वयामध्ये इतर व्याधी घेऊन ते ज्या प्रकारे काम करत आहेत ही गोष्ट विलक्षण आहे.
-
राजकीय मतभेद असणे हा एक भाग झाला. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणणारा हा महाराष्ट्र आहे.
-
शरद पवारांच्या गुणांची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे असेही राज ठाकरे म्हणाले.
-
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या वतीने अभीष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
-
शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीच्या सूत्रानुसारच पक्षाची वाटचाल सुरू राहावी. सर्व घटकांना बरोबर घेऊन राजकारण आणि समाजकारण केल्यास राष्ट्रवादीबद्दल विश्वासाचे वातावरण तयार होईल, असा मंत्र पवार यांनी या वेळी दिला. -
राष्ट्रवादी काँग्रेस भले लहान पक्ष असला तरी बांधिलकी असलेले कार्यकर्ते हे पक्षाचे वैशिष्ट्य आहे, असे शरद पवार म्हणाले.
-
आधुनिकतेची कास धरीत समाजातील उपेक्षित आणि सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन निश्चितच वेगळा असेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

Maharashtra Assembly Monsoon Session Clash Live Updates : “लोक म्हणतायत, सगळे आमदार माजलेत”, पडळकर-आव्हाड राड्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांचा सभागृहात संताप