-
पुणे : मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नांत असताना तोल जाऊन २४ वर्षीय तरुण ७० फुट खोल खाणीत पडला.
-
पुण्यातील वेताळ टेकडी इथे ही घटना घडली.
-
रामदास उभे असं या तरुणाचं नाव असून तो सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आपल्या दोन बहिणींसह वेताळ टेकडीवर फिरायला आला होता.
-
टेकडीवरून पडणाऱ्या मांजराला वाचविण्याच्या प्रयत्न करत असताना तोल जाऊन तो खाणीत पडला.
-
याची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि तरुणाला सुखरूप बाहेर काढले.
-
रामदास उभे खाणीतील झाडाझुडपांत अडकल्यामुळे त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
-
या दुर्घटनेनंतर प्रशासानाला जाग आली असून आता या ठिकाणी तारेचं कुंपण उभारलं जात आहे. (सर्व फोटो : आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल