-
पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून पाच कामागारांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री (३ फेब्रुवारी २०२२ रोजी) घडली. (सर्व फोटो : आशिष काळे, एक्सप्रेस फोटो)
-
या अपघातामध्ये अन्य पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. पाच कामगारांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दुजोरा दिलाय.
-
या घटनेबाबत राहुल श्रीरामे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडिया बंगल्याजवळ एका मॉलचे बांधकाम सुरु आहे त्याच ठिकाणी ही दुर्घटना घडलीय.
-
रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास काम सुरु असतानाच अचानक येथील स्लॅबसाठी बांधलेला काही भाग काम करणाऱ्या कामगारांवर कोसळला.
-
स्लॅबसाठी लोखंडाच्या सळ्यांची तयार केलेली जाळी कोसळून त्याखाली १० कामगार अडकले.
-
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.
-
दोन तासांच्या प्रयत्नानंतर या जळीखाली अडकलेल्या सर्व दहा कामगारांना बाहेर काढण्यात आलं. त्यापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय.
-
पाच जखमी कामगारांवर उपचार सुरू असून रात्री उशीरापर्यंत मदतकार्य सुरु होतं.
-
अपघातामध्ये मृत्यू झालेले हे कामगार कुठले आहेत आणि नेमके किती कामगार कामावर होते, याबाबत अधिक तपास सुरू आहे.

India On Trump : ‘अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत…’, ट्रम्प यांनी २५ टक्के अतिरिक्त कर लादल्यानंतर भारताचं सडेतोड उत्तर