-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि मिताली अमित ठाकरे यांना काही दिवसांपूवी पुत्ररत्न प्राप्ती झाली.
-
मनसे पदाधिकारी सचिन मोरे यांनी राज ठाकरे आजोबा झाल्याची गोड बातमी फेसबुक अकाऊंटवरून दिली होती.
-
काही आठवड्यांपूर्वीच राज यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची बातमी प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचली होती.
-
राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या नवीन निवासस्थानी या नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी काही आठवड्यांपासून सुरु होती.
-
राज आणि त्यांच्या पत्नी म्हणजेच बाळाच्या आजी शर्मिला ठाकरे हे या बातमीमुळे फार आनंदात आहेत.
-
आता पहिल्यांदाच अमित ठाकरे यांनी बाळासोबतचा गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
काही महिन्यांपूर्वीच राज हे त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानावरुन सहकुटुंब ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी शिफ्ट झाले.
-
‘शिवतीर्थ’ या नवीन घरामध्ये आता ही चिमुकली पावलं खेळताना बागडताना दिसणार आहेत.
-
अमित ठाकरे यांचा विवाह २७ जानेवारी २०१९ रोजी मिताली बोरुडे यांच्याशी झाला.
-
अमित यांच्या लग्नाला राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमित ठाकरे / फेसबुक)

“मुघलांना विरोध करणारे मराठा साम्राज्य…”, मराठी भाषेच्या वादावर JNU च्या कुलगुरूंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…