-
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पार धोक्यात आल्याचे अलीकडच्या घटनांवरून स्पष्ट होते, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमधून केली आहे.
-
त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी सर्वसामान्यांची भूमिका असली तरी भाजपा अशी मागणी करणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले
-
हनुमान चालीसा महाराष्ट्रात नाही, तर काय पाकिस्तानात म्हणायची, असा सवाल फडणवीस यांनी केला.
-
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पोलीस ठाण्याबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
-
सोमय्या यांना झेड सुरक्षा असताना आणि पोलीस ठाण्याबाहेर असलेला कार्यकर्त्यांचा जमाव हल्ला करण्याची शक्यता असल्याचे सांगूनही पोलीस तो रोखू शकले नाहीत, अशी खंत फडणवीस यांनी व्यक् केलीय. त्यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
-
झेड सुरक्षा असलेल्या व्यक्तीला पोलीस संरक्षण देऊ शकत नसतील, तर अन्य कोणी सुरक्षित राहू शकणार नाही, असं फडणवीस म्हणाले.
-
मुंबई पोलिसांच्या इतिहासातील लाजिरवाणा काळ सध्या सुरू असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
-
राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्याऐवजी भाजपा सत्ताधाऱ्यांशी लढेल असं फडणवीस म्हणालेत.
-
“राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यापेक्षा आम्ही सत्ताधाऱ्यांशी लढा देत राहू,” असं फडणवीस म्हणाले. (सर्व फाइल फोटो)

India Pakistan War Live Updates : माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरु! पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईला भारताचा ‘करारा जवाब’