-
महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नवे पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक फणसाळकर यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
-
संजय पांडे ३० जून रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
-
विवेक फणसाळकर हे १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
-
मुंबईचे पोलीस आयुक्त होण्यापूर्वी ते पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे डीजी आणि एमडी म्हणून कार्यरत होते.
-
२९ जून रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी विवेक फणसळकर यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली.
-
विवेक फणसळकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र एटीएस प्रमुख अशा महत्त्वाच्या पदांवर सेवा बजावली आहे.
-
२००८ साली सुमारे ८ दिवस चाललेल्या दोन समाजातील दंगली शांत करण्यात विवेक फणसाळकर यांचा मोठा वाटा होता.
-
विवेक फणसळकर हे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल पीसी अलेक्झांडर यांचे एडीसीही होते.
-
याशिवाय त्यांनी सीआयडी ते गुन्हे शाखा आणि वाहतूक विभागातही मोठ्या पदावर काम केले.

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक