-
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीच्या (ED) पथकाने छापा टाकला. ईडीच्या या कारवाईनंतर भाजपा नेते नितेश राणे यांनी संजय राऊतांना टोला खोचक लगावला आहे. “सगळ्यांची सकाळ खराब करणारे संजय राऊत यांची सकाळ खराब झाल्याचे बघून समाधान मिळतंय”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
-
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांच्यावर ईडीची चौकशी होणं ही पहिली वेळ नाही. चौकशीत काहीतरी निष्पन्न झालं असेल त्यामुळे ईडीने पुन्हा चौकशी सुरू केलीय. आता या कारवाईत काय सापडतं त्यावर ईडीमार्फत कारवाई केली जाईल. त्यांच्यावर होत असलेली कारवाई ही सूडबुद्धीने नाही. याआधी देखील त्यांना बोलावलं होतं आता त्याची पुढची पायरी म्हणून ही चौकशी सुरू असल्याची प्रतिक्रिया विनायक मेटे यांनी दिली आहे. ते बीड मध्ये बोलत होते.
-
राऊतांवर ही कारवाई अपेक्षित होतीच. एकदा ईडीचा तपास सुरु झाला की त्यांचे ऑफिस, घर चेक करतात. भुजबळ फार्मवर पण किती वेळा धाडी पडतात. मात्र, त्यांना अटक होईल का? त्याबाबत बोलू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.
-
संजय राऊत यांना अटक होणार आहे. ही कारवाई यापूर्वीच व्हायला पाहिजे होती. उशिरा कारवाई झाली. एका साध्या पत्रकाराकडे एवढे पैसे कुठून आले? अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे. संजय राऊत व उद्धव ठाकरे यांनी पदाचा दुरूपयोग केला आहे. असे त्या म्हणाल्या.
-
संजय राऊतांना अटक झाली, तर मुलाखत कोणाला देणार? अशी काळीज सद्या उद्धव ठाकरेंना असल्याचा खोचक टोला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
-
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर रविवारी (३१ जुलै) सकाळी ७ वाजता ईडीच्या पथकाने कारवाई केली. यानंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राऊतांच्या मैत्री बंगल्याबाहेरच ईडीविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. दुसरीकडे राज्यात राजकीय नेत्यांकडूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील बीड दौऱ्यावर असताना ईडीच्या राऊतांवरील कारवाईवर भाष्य केलं. “या यंत्रणांना देशातील कोणत्याही व्यक्तीची चौकशी करण्याचा अधिकार आहे,” असं मत पवारांनी व्यक्त केलं.
-
देशात दडपशाही सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर दबाब आणण्याच काम केलं जातं आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. जे आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले, त्यांच्यावर भ्रष्टाचार होते. मग आता ते वाशींग पावडरमध्ये स्वच्छ केले का? अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
-
तपासयंत्रणांचा उपयोग राजकारणासाठी केला जातोय, हे लपून राहत नाही. राज्यपालांनी जे व्यक्तव्य केले आहे ते निषेधार्ह आहे. मराठी माणसाला कमी लेखणारे आहे. असे आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.
-
अर्जुन खोतकर यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांनी का शिवसेनेची साथ सोडली, ते शिंदे गटात का गेले, याचे उत्तर खोतकर देऊ शकतात. आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही. ईडीने आमच्यामुळे नाही तर कदाचित त्यांच्या काही गोष्टी उघडकीस आल्या असतील म्हणून कारवाई केली आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले.
-
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. भाजपासह शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाकडून या कारवाईचं समर्थन केलं जातं आहे, तर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून ही सुडाची कारवाई असल्याचा आरोप करत टीका होत आहे. आता राऊतांवरील कारवाईवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “राऊतांना अटक होतेय की नाही हे मला माहिती नाही. मी ईडीचा अधिकारी नाही,” असं मत शिंदेंनी व्यक्त केलं.
-
संजय राऊतांवरील छाप्यामागचा सुत्रधार कोण? हे तपासलं पाहिजे – खासदार अरविंद सावंत गुजराती आणि राजस्थानींनी महाराष्ट्र सोडल्यास मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे राज्यपाल स्वत: सांगतात. तसं पाहिलं तर श्रीमंत कोण आहे आणि कोणाच्या घरावर छापा पडतो आहे? असा प्रतिक्रिया शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी दिली आहे. तसेच याप्रकरणाचा सुत्रधार कोण आहे? हेही बघितलं पाहिजे, असेही ते म्हणाले.
-
ईडीची कारवाई विरोधकांवरच का? असा प्रश्न राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विचारला आहे. ईडीची कारवाई कोणावर होते आणि कोणावर होत नाही, हे संपूर्ण महाराष्ट्र बघतो आहे. ईडीची कारवाई नवाब मलिक आणि अनिल देशमुख्य यांच्यावरही झाली. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही, असेही त्या म्हणाला.
-
केंद्र सरकारच्या देश विकणाऱ्या धोरणावर जो बोलेल त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्राच्यामाध्यमातून कारवाई सुरू आहे. संजय राऊतांवरील कारवाई ही दबावामुळे झाली आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळ आणखी किती लोकांवर कारवाई करावी, ते सरकारने ठरवावं, अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
-
नसे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र ईडीच्या या कारवाईचे समर्थन केले असून राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊतांना आता कोणताही पक्ष घेणार नाही. त्यांनी आता भिंतीकडे तोंड करून बोलण्याची सवय करून घ्यावी, असा टोला देशापांडे यांनी लागवला आहे.
-
संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. यावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांना ताब्यात घेणे ही आणीबाणी असून इंदिरा गांधी यांनी एकवेळ आणीबाणी लावली होती. त्याहीपेक्षा हे भयंकर आहे, अशी प्रतिक्रिया खैरे यांनी दिली आहे. भाजपकडून शिवसेनेला संपवून टाकण्याचे प्रयत्न सुरु असून शिवसेना संपणार नाही. भाजपचे नेतेच या कारवाईच्या विरोधात असल्याचं खैरे यांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE : “…तर रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो”, राज्य सरकारच्या ‘त्या’ प्रस्तावानंतर मनोज जरांगेंचा शब्द