-
EPFO e-Nomination process: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने खातेधारकांसाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य केले आहे.
-
ई-नॉमिनेशनमुळे ईपीएफ खातेधारकाचे अकाली निधन झाले तर नॉमिनीसाठी नमूद करण्यात आलेल्या कुटुंबाच्या सदस्याला आर्थिक लाभ मिळणे सोईस्कर होणार आहे.
-
पीएफ अकाऊंट होल्डर आता दोनपेक्षा अधिक कुटुंबीयांची नॉमिनी म्हणून नोंद करू शकतो.
-
पीएफ खातेधारकाने ई-नॉमिनेशन केले नाही तर त्याला आपल्या खात्यात असलेली रक्कमदेखील पाहता येणार नाही.
-
ई नॉमिनेशन करण्यासाठी पीएफ खातेधारकाचा यूएएन नंबर सक्रीय असणे गरजेचे आहे. तसेच खातेधारकाचा मोबाईल क्रमांकही आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.
-
ई-नॉमिनेशनची प्रक्रिया करण्यासाठी EPFO ऑफिशियल वेबसाईट epfindia.gov.inवर जावे लागेल. त्यानंतर सर्व्हिस टॅबवर क्लीक करावे.
-
त्यानंतर ड्रॉडाऊन मेनूमधून For Employees हा ऑप्शन सिलेक्ट करावा.
-
त्यानंतर UAN नंबर तसेच पासवर्ड टाकून लॉगीन करावे. लॉगीन केल्यानंतर मॅनेज असा ऑप्शन दिसेल.
-
त्यानंतर ई-नॉमिनेशनचा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर पत्ता मूळ पत्ता तसेच सध्या राहत असलेला पत्ता टाकावा.
-
त्यानंतर फॅमिली डिक्लेरेशनमध्ये बदल करण्यासाठी येस हा ऑप्शन सिलेक्ट करावा.
-
त्यानंतर ज्या व्यक्तीला नॉमिनी करावयचे आहे, त्या कुटुंबीयाची माहिती भरून सेव्ह ऑप्शनवर क्लीक करावे.
-
यानंतर ई-साईन ऑप्शनवर क्लीक करावे. तसेच तुमचा आधार क्रमांक टाकावा. आधार क्रमांक टाकल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.
-
ओटीपी टाकल्यानंतर ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण होईल.

“देव माफ करेल कर्म नाही” सापाला अक्षरश: जाळून टाकलं अन् माणसांमध्ये जास्त विष असतं हे सिद्ध केलं; VIDEO पाहून संतापले लोक