-
नुकताच बर्मिंघम येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. मीराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात ही नेत्रदीपक कामगिरी केली होती.
-
पदक जिंकल्यानंतर मायदेशी परतलेल्या मिराबाई चानू यांनी कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा केला. त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेयर केले आहेत.
-
साईखोम मीराबाई चानू यांचा जन्म ८ ऑगस्ट १९९४ मध्ये पूर्व इम्फालमधील नोंगपोक काचिंग येथे झाला. त्या भारताच्या स्टार वेटलिफ्टर आहेत.
-
मीराबाई चानू यांनी २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ४९ किलो गटात रौप्य पदक जिंकले होते.
-
क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.
-
तसेच मीराबाई चानू यांना २०१८ मध्ये भारत सरकारने मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे.

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case