-
गुजरातमधील एका गोदामातून म्याऊ म्याऊ नावाच्या पार्टी ड्रगचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
-
बाजारात याची किंमत १ हजार कोटींपेक्षा जास्त आहे.
-
आरोपींनी अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि कॉलिंग अॅप्सचा वापर केला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
-
मेफेड्रोन, ज्याला ‘म्याव म्याऊ’ किंवा MD म्हणूनही ओळखले जाते.
-
हे एक कृत्रिम सायकोट्रॉपिक उत्तेजक आहे जे नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायद्यांतर्गत प्रतिबंधित आहे.
-
पीटीआयच्या अहवालानुसार. हे सामान्यतः रेव्ह आणि पार्ट्यांमध्ये प्रसारित केले जाते.
-
म्याऊ म्याऊ ड्रगचा शरीरावर घातक परिणाम होतो. याचे अधित सेवन करणारी व्यक्ती मानसिक आजाराला बळी पडू शकते
-
गेल्या वर्षी या ड्रगच्या अतिसेवनामुळे एका किशोरवयीन मुलाने आपले लिंग कापले होते आणि आपल्या आईवर वारही केले होते.
-
या ड्रगच्या सेवनामुळे हृदय गती वाढणे, नाकातून रक्त येणे, पॅरानोईया आणि रक्तदाब वाढणे तसेच श्वासोच्छवासाच्या समस्या देखील उद्भवू शकतात.
-
गेल्या दशकात, पार्टी ड्रगच्या सेवनामुळे अनेक लोक मरण पावले आहेत.
-
अमेरिकेत एक, युनायटेड किंगडममध्ये पाच आणि स्वीडनमध्ये गेल्या १२ वर्षांत एकाचा मृत्यू झाला आहे.
-
मेफेड्रॉन या रासायनिक नावाने ओळखले जाणारे म्याऊ म्याऊ ड्रगला भारतात मान्यता नाही
-
अंमली पदार्थ कायद्यात ते बेकायदेशीर म्हणून सूचीबद्ध आहे.
-
भारताव्यतिरिक्त, बहुतेक देशांनी ते प्राणघातक आणि काही प्रमाणात व्यसनाधीन स्वरूपामुळे अवैध पदार्थ म्हणून घोषित केले आहे.

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर