-
हिमाचल प्रदेशात आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळे १६ जणांनी आपला जीव गमावला आहे. पुराच्या पाण्यात ८ जण वाहून गेले आहेत. कुल्लू जिल्ह्यातील पानवी गावात अतिवृष्टीमुळे इमारत कोसळली आहे.(फोटो सौजन्य-पीटीआय)
-
पाण्याच्या प्रवाहात धर्मशालामधील कांगरा परिसरातील रेल्वे पूल कोसळला आहे. चक्की नदीवर अरुंद मार्गावर ८०० मीटरचा हा लांब पूल उद्ध्वस्त झाला आहे. (फोटो सौजन्य-पीटीआय)
-
भुस्खलनामुळे मंडी जिल्ह्यात ट्रक उलटल्याने मोठं नुकसान. मंडीसह कांगरा आणि चंबा जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका(फोटो सौजन्य-पीटीआय)
-
मंडीमध्ये भुस्खलनामुळे घर कोसळ्यानंतर प्रशासनाकडून बचावकार्य राबवण्यात आले (फोटो सौजन्य-पीटीआय)
-
भुस्खलन आणि पुराच्या पाण्यामुळे मंडी जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्ते वाहतूक विस्कळीत. अनेक ठिकाणी गाड्यांचेही मोठे नुकसान (फोटो सौजन्य-पीटीआय)
-
हमीरपूरच्या खेरी सुजानपूर परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या २० लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य राबवण्यात आले. (फोटो सौजन्य-पीटीआय)
-
अतिवृष्टीमुळे मंडी जिल्ह्यात ठिकठिकाणी भुस्खलन. सुंकेन रस्त्यावर बस दरीत कोसळताना थोडक्यात बचावली. (फोटो सौजन्य-पीटीआय)
-
शिमला जिल्ह्यातील थिओग परिसरात भुस्खलनामुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान(फोटो सौजन्य-पीटीआय)
-
अतिवृष्टीमुळे शिमला जिल्ह्यात शनिवारी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे चित्र आहे. (फोटो सौजन्य-पीटीआय)

Pakistan On US : पाकिस्तानची नवी खेळी, थेट अमेरिकेला दिली ‘ही’ मोठी ऑफर; भारतावर काय परिणाम होणार?