-
आज संयुक्त किसान मोर्चाकडून दिल्लीतील जंतरमंतरवर ‘महापंचायत’ बोलावण्यात आली आहे. यामध्ये विविध राज्यांतील शेतकरी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
-
आज जंतरमंतरवर होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मोठ्या प्रमाणात शेतकरी येण्यास सुरूवात झाली आहे.
-
लखीमपूर खेरीयेथील पीडित कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि तुरुंगातून शेतकर्यांची सुटका करावी, या मागणीसाठी शेतकर्यांनी ही महापंचायत बोलावली आहे.
-
त्यापूर्वी दिल्लीत कडक सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी दिल्ली-हरियाणाच्या टिकरी सीमेवर बॅरिकेड्स लावले आहेत.
-
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली असल्याची माहिती आहे.
-
आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांनी राकेश टीकैत यांनाही ताब्यात घेतले आहे. ”सरकारच्या इशाऱ्यावर काम करणारे दिल्ली पोलीस शेतकऱ्यांचा आवाज दाबू शकत नाहीत. या अटकेमुळे नवी क्रांती होणार आहे, असे ट्वीट राकेश टीकैत यांनी केले आहे.

प्रसिद्ध अभिनेत्याने घटस्फोटानंतर ९ वर्षांनी केला साखरपुडा; अमृता खानविलकर कमेंट करत म्हणाली…