-
भारतात रेल्वेचे जाळे सगळ्यात मोठे आहे. ही रेल्वे जगातील चौथी सर्वांत मोठ्या रेल्वेसेवा आहे. १२.२७ लाख कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे, कर्मचारीसंख्येत जगातील आठवी सर्वांत मोठी व्यावसायिक संस्था आहे.
-
भारतात लांबचा पल्ला गाठण्यासाठी लोक रेल्वेचा वापर करतात. भारतात अशा अनेक रेल्वे आहेत ज्यांचा वेग सर्वाधिक आहे. ताशी १२० ते १८० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या रेल्वे काही तासांमध्येच लांबचे अंतर कापतात
-
भारतीय रेल्वे हा प्रत्येक सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. रेल्वे दररोज हजारो गाड्या चालवते. लोकांचा वेळ वाचवण्यासाठी रेल्वेने गेल्या काही वर्षांत अनेक प्रीमियम ट्रेन सुरू केल्या आहेत.
-
याच्या मदतीने तुम्ही अवघ्या काही तासांत लांबचे अंतर कापू शकता. आम्ही तुम्हाला देशातील अशाच सर्वात वेगवान धावणाऱ्या रेल्वेची माहिती देणार आहोत
-
१५ फेब्रुवारी २०१९ रोजी देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वंदे भारत रेल्वेची सुरुवात झाली.
-
ही रेल्वे ताशी १८० किमी वेगाने धावते. ही ट्रेन नवी दिल्ली ते बनारस दरम्यान धावते.
-
गतिमान एक्सप्रेस ही देशातील दुसरी सर्वात वेगवान रेल्वे आहे. ही रेल्वे ताशी १६० किमी वेगाने धावते.
-
ही रेल्वे दिल्लीतील हजरत निजामुद्दीन ते झाशीपर्यंत धावते.
-
नवी दिल्ली- कानपूर शताब्दी ताशी १४० किमी वेगाने धावते.
-
ही रेल्वे दिल्ली ते कानपूर अवघ्या ४.५५ तासात पोहोचते.
-
नवी दिल्ली ते भोपाळला जाणारी भोपाळ शताब्दी ताशी १५० किमी वेगाने धावते.
-
ही रेल्वे फक्त ८.३० तासात दिल्लीहून भोपाळला पोहोचू शकते.
-
मुंबई ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेस रेल्वेचेही नाव वेगवान गाड्यांच्या यादीत समाविष्ट आहे.
-
ही रेल्वे ताशी १४० किलोमीटर वेगाने धावते. मुंबई ते दिल्लीतील अंतर ही रेल्वे अवघ्या १५ तासात कापते.
-
नवी दिल्ली ते हावडा दरम्यान धावणारी राजधानी ताशी १३५ किलोमीटर वेगाने धावते.
-
ही रेल्वे ३ मार्च १९६९ पासून धावत आहे. ही रेल्वेच्या प्रिमियम ट्रेनपैकी एक आहे.

“…तर अमेरिकेत येण्यावर कायमची बंदी घालू”, अमेरिकेचा भारतीयांना थेट इशारा