-
हैदराबादमधील ज्युबली हिल्समधील अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांनी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रीयेसाठी चक्क मेट्रोमधून जिवंत हृदय नेलं. (सर्व फोटो : Twitter/ltmhyd वरुन साभार)
-
नागोले येथील रुग्णालयामध्ये एका रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी मेट्रोची मदत घेतली. हैदाराबाद मेट्रोच्या ट्वीटर हॅण्डलवरुनच यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
-
हैदराबाद मेट्रो रेल्वे (एल अॅण्ड टी एमआरएचएल) प्रशासनाने हे हृदय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी विशेष सहकार्य केलं. मेट्रोने सोडलेल्या या विशेष ट्रेनने २१ मिनिटांमध्ये २५ किमीचं अंतर कापलं.
-
अपोलो रुग्णालयामधील डॉक्टर गोखले यांच्या नेतृत्वाखालील टीमने ही कामगिरी केली.
-
एलबी नगरमधील कमीनेनी रुग्णालयातून नागोली मेट्रो स्थानकापर्यंत हे हृदय मेट्रोमधून आणण्यात आलं.
-
यासंदर्भातील सविस्तर माहिती ट्वीटरवर फोटो शेअर करुन मेट्रो प्रशासनाने दिली आहे.
-
नागोली मेट्रो स्थानकामध्ये अपोलो रुग्णालयाची रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आलेली. ज्यामधून हे हृदय रुग्णालयामध्ये नेण्यात आलं.
-
-
विशेष म्हणजे हैदराबादमध्ये नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी मोठ्याप्रमाणात मेट्रोचा वापर केला जात असताना एका रुग्णासाठी ही विशेष मेट्रो धावली.
-
जवळजवळ २० हजार क्रिकेटप्रेमी टी-२० सामना पाहण्यासाठी उपल मेट्रो स्थानकाचा वापर करत असताना ही मेट्रो सोडण्यात आली.
-
या संदर्भात बोलवताना हैदराबाद मेट्रोचे निर्देशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के. व्ही. बी. रेड्डी यांनी आम्ही लोकांच्या सेवेसाठी कायमच तत्पर असतो आणि अशाप्रकारे अधिकचे श्रम घेऊन मदत करण्याचीही आमची तयारी असते असं सांगितलं.
-
मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सर्व डॉक्टर्स आणि मेट्रो कर्मचाऱ्यांचे या चांगल्या कामासाठी आभार मानले.
-
हैदराबाद पोलिसांनीही हे ट्वीट शेअर करत आम्हाला या कामाचा अभिमान वाटतोय असं म्हणत मेट्रो प्रशासनाला शब्बासकी दिली आहे.

शेतकऱ्याचा नांगरणीसाठी भन्नाट जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी बैलांशिवाय हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्