-
कथीत १०० कोटी वसुली प्रकरणी गेल्या ११ महिन्यांपासून ‘ईडी’ कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज अखेर जामीन मंजूर झाला आहे. देशमुखांना मिळालेल्या जामीनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
“अनिल देशमुख यांना गेल्या ११ महिन्यांत शारीरिक व मानसिक त्रास झाला असेल. मात्र, उशीरा का होईना अनिल देशमुख यांना न्याय मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे या ११ महिन्यांच्या तपासांत काहीही निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, आज त्यांना जामीन मिळाला आहे, लवकरच ते या प्रकरणातून निर्दोष मुक्त होतील”, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.
-
यावेळी बोलताना त्यांनी भाजपावरही आरोप केले. “न्यायव्यवस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण विश्वास आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोन्ही प्रकरणं भाजपाने जाणीवपूर्वक घडवून आणलेलं कटकारस्थान होतं. त्यामुळे आता केवळ एक जामीन मिळाला आहे, येत्या काही दिवसांत नवाब मलिकही बाहेर येतील”, असेही ते म्हणाले.
-
“आज सत्याचा विजय झाला आहे. अनिल देशमुखांवर खोटे आरोप करण्यात आले होते. आज मी न्यायालयाचे आभार मानते. त्यांनी आज आम्हाला न्याय दिला. ही लढाई पुढे लढायची आहे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
-
“आता अनिल देशमुखांनंतर नवाब मलिकांसाठीही न्याय मागायचा आहे”, असेही त्या म्हणाल्या.
-
“अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाल्यानंतर मला अतिशय आनंद झाला आहे. कारण ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाला खूप उशीर होतो. त्यामुळे हा जामीन मिळणं अतिशय महत्त्वाचे होते”, अशी प्रतिक्रिाया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
-
“आता ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाला आहे, लवकरच त्यांना सीबीआयच्या प्रकरणातही जामीन मिळेल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
-
“अनिल देशमुखांना जामीन मिळाला आहे. तर ती एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. ही न्यायालयाची अंतर्गत बाब आहे. त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही”, असे उदय सामंत म्हणाले.
-
दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अनिल देशुखांच्या जामिनाबाबत विचारलं असता त्यांनी उत्तर द्यायचे टाळले. “अनिल देशमुख यांना जामीन मिळाला, ही एक न्यायलयीन प्रक्रिया आहे, मी यावर बोलणं योग्य नाही”, असे ते म्हणाले.

Air India Plane Crash: “अपघातानंतर मला शुद्ध आली तेव्हा…”, विमान अपघातातून वाचलेल्या विश्वास रमेश यांनी सांगितलं नेमकं काय घडलं