-
८ ऑक्टोबर रोजी वायू सेना दिवस साजरा केला जातो. या दिवसानिमित्त वायू दलाकडून चंदीगडमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.
-
त्तपूर्वी चंदीगडमधील सुखना तलावावर वायू दलाकडून संचलनासह साहसी प्रात्यक्षिक सरावाचे आयोजन करण्यात आलं होतं.
-
भारतीय वायुसेनेने गुरुवारी एअर फोर्स डे परेड आणि फ्लाय पास्टसाठी फुल ड्रेस सराव आयोजित केला होता. (एक्सप्रेस फोटो जसबीर मल्ही)
-
फ्लाय पास्टमध्ये भाग घेतलेल्या विमानांमध्ये व्हिंटेज डकोटा, लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर, चिनूक मीडियम लिफ्ट हेलिकॉप्टर्स, अपाचे हेलिकॉप्टर, ध्रुव हेलिकॉप्टर, एमआय-१७, राफेल्स, सुखोई-३० एमकेआय, जग्वार्स, मिराजेस, तेजस लाइट कॉम एअरक्राफ्ट, एमबारा एअरक्राफ्ट यांचा समावेश होता.
-
तसेच AWACS विमान, सी-१७ वाहतूक विमान, सी-१३० जे आणि एएन-३१ विमानांचा समावेश होता. (एक्स्प्रेस फोटो जसबीर मल्ही)
-
८ ऑक्टोबर १९३२ मध्ये, भारतातील हवाई दल अधिकृतपणे युनायटेड किंगडमच्या रॉयल एअर फोर्सचे सहाय्यक दल म्हणून उभे केले गेले. (एक्स्प्रेस फोटो जसबीर मल्ही)
-
८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या संचलनाला माजी लष्करप्रमुखांसह अनेक निवृत्त हवाई दल प्रमुख उपस्थित राहण्याची शक्यता आहे. (जसबीर मल्ही यांचे एक्सप्रेस फोटो)
-
सुखना तलावावर हवाई दलाकडून आयोजित करण्यात आलेला हा सराव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (एक्स्प्रेस फोटो जसबीर मल्ही)
-
वायुसेना दिनी आयएएफच्या नवीन गणवेशाचेही अनावरण केले जाईल. (एक्स्प्रेस फोटो जसबीर मल्ही)
-
वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, एअर मार्शल एस प्रभाकरन यांच्या उपस्थितीत फुल ड्रेस सराव घेण्यात आला. (एक्स्प्रेस फोटो जसबीर मल्ही)
-
याशिवाय हवाई दलाच्या पॅराशूट जवानांनी आकाशात सरावही केला.
-
सुखना तलावावर सूर्यकिरण आणि सारंग संघांद्वारे विविध विमानांचे फ्लायपास्ट आणि एरोबॅटिक्सचे प्रदर्शनही ठेवण्यात आले. (एक्स्प्रेस फोटो जसबीर मल्ही)

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल