-
गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये रविवारपासून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. या निवडणुकीसाठी भाजपाकडून गाणं लॉन्च करण्यात आलं आहे.(फोटो सौजन्य- निर्मल हरिंद्रन)
-
भाजपा प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्यासह गृहमंत्री हर्ष संघवी, भाजपाचे महासचिव प्रदीपसिंह वाघेला यावेळी उपस्थित होते.(फोटो सौजन्य- निर्मल हरिंद्रन)
-
‘आम्ही हा गुजरात बनवला आहे’ असा या निवडणूक प्रचाराचा नारा आहे. भाजपा महासचिव प्रदीपसिंह वाघेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकासोबत पोझ देताना…(फोटो सौजन्य- निर्मल हरिंद्रन)
-
गांधीनगरच्या ‘कमलम’ या भाजपा कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पंतप्रधानांच्या फलकासोबत फोटो काढताना भाजपाच्या महिला कार्यकर्त्या…(फोटो सौजन्य- निर्मल हरिंद्रन)
-
पक्षाच्या गाण्यावर भाजपा कार्यकर्त्यांनी ठेका धरला…(फोटो सौजन्य- निर्मल हरिंद्रन)
-
गुजरातमध्ये भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष अशी तिरंगी लढत होताना दिसत आहे. भाजपाला सत्तेतून खेचण्यासाठी काँग्रेस आणि आपकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे.
-
गुजरातमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात एक डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात पाच डिसेंबरला मतदार आपला हक्क बजावतील.
-
गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आठ डिसेंबरला होणार आहे. १९९५ पासून सलग पाच वेळा भाजपाने ही निवडणूक जिंकली आहे.
-
गुजरात निवडणुकीत भाजपाला आम आदमी पक्षाचं कडवं आव्हान असणार आहे. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी राज्यात झंझावाती प्रचार केला आहे. आपने उमेवारांच्या ११ याद्या आत्तापर्यंत जारी केल्या आहेत.
-
गुजरात भाजपाकडून अद्याप उमेवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘पापा नी परी’ या भावनगरमधील सामूहिक विवाह सोहळ्यात हजेरी लावली होती. भावी आयुष्यासाठी नवदाम्पत्यांना मोदींनी आशीर्वाद दिले. (फोटो सौजन्य-नरेंद्र मोदी यांच्या ट्विटरवरुन)
-
यावेळी उपस्थितांमध्ये मोदींची झलक टिपण्यासाठी चढाओढ सुरू होती. (फोटो सौजन्य-नरेंद्र मोदी यांच्या ट्विटरवरुन)

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या