-
शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आणि अखेर १०० हून अधिक दिवसांनी त्यांची तुरुंगातून सुटका झाली.
-
यानंतर शिवसैनिकांनी संजय राऊत यांचं राज्यभरात जल्लोषात स्वागत केलं.
-
जेलच्या बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांच्या घराजवळ शिवसैनिकांनी जल्लोष केला.
-
ठाण्यात संजय राऊत यांच्या जामिनानंतर जल्लोष करण्यात आला.
-
खासदार राजन विचारे यांच्यासह शिवसैनिकांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेला हार घालून जल्लोष केला.
-
यावेळी खासदार राजन विचारे यांच्यासह जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला आघाडी प्रमुख समिरा मोहिते हेही उपस्थितीत होते. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
-
संजय राऊत यांनी भाऊ सनिल राऊतबरोबर जाऊन मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणपतीचं दर्शन घेतलं.
-
नवी मुंबईतही संजय राऊत यांची जामिनानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
-
राऊतांना तब्बल शंभर दिवसांनी कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर शिवसेनेत उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
-
संपूर्ण राज्यात शिवसैनिक आनंदोत्सव साजरा करताना दिसत आहेत.
-
नवी मुंबई शिवसेनेच्या नेत्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.
-
ढोल ताशांच्या गजरात नाचत, फटाके फोडत आणि एकमेकांना पेढे भरवून राऊत यांच्या सुटकेचा आनंद साजरा करण्यात आला.
-
यावेळी नवी मुंबईमधील शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडत एकमेकांना पेढे भरून शिवसैनिकांनी एकाच जल्लोष केला.
-
यावेळी एकमेकांना पेढे भरवत त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांची जामीनावर सुटका होऊन ते बाहेर येतात कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
-
कोणत्याही दडपणाला न घाबरता पक्षासाठी लढणारे शिवसेनेचे फायर ब्रँड नेते, शिवसेनेचा ढाण्या वाघ, शिवसेनेची तोफ अशा प्रकारच्या घोषणा यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.
-
येवल्यातील शिवसैनिकांनी विंचूर चौफुली येथे पेढे वाटत फटाके फोडत जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यात तालुका अध्यक्ष रतन बोरणारे धीरज परदेशी, भास्कर कोंढरे यांनी प्रतिक्रिया दिली.
-
राऊतांच्या जामिनानंतर जळगावमधील पाचोरा येथे फटाके फोडून जल्लोष करण्यात आले. (सर्व फोटो – गणेश शिर्सेकर, दीपक जोशी आणि आरएनओ)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल