-
राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
गुन्हा दाखल झाल्यानंतर आव्हाड यांनी टोकाची भूमिका घेत आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले.
-
मात्र आव्हाडांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा धारण केला आहे.
-
तर दुसरीकडे आव्हाड खरंच राजीनामा देणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
-
याच प्रश्नाचे उत्तर जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी दिले आहे. त्या माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या.
-
जितेंद्र आव्हाड हे खरंच आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत का? असा प्रश्न ऋता आव्हाड यांना विचारण्यात आला.
-
या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याऐवजी त्यानी जमा झालेल्या लोकांना आव्हाड यांनी राजीनामा द्यावा का ते विचारावे, असे विधान केले. राजीनामा द्यावा का? असा सवाल ऋता आव्हाड यांनी समर्थकांना उद्देशून केला.
-
त्यानंतर ऋता आव्हाड यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांच्या समर्थकांना ‘नाही’ असे उत्तर दिले.
-
आव्हाड यांना राजीनामा देऊ नये, अशा भावना त्यांच्या समर्थकांना व्यक्त केल्या.
-
दरम्यान, ऋता आव्हाड यांनी पोलिसांविरोधात आक्रमक पवित्रा धारण केला आहे.
-
आव्हाड यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाही नाही, तर आम्ही पोलिसांविरोधात कोर्टात जाऊ, असा इशारा ऋता आव्हाड यांनी दिला आहे.
-
तसेच आव्हाड यांच्याविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या महिलेविरोधातही तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती ऋता आव्हाड यांनी दिली. (सर्व फोटो- जितेंद्र आव्हाड यांच्या फेसबूक अकाऊंटवरून)

शेतकऱ्याचा नांगरणीसाठी भन्नाट जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी बैलांशिवाय हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्