-
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर रविवारी रात्री एक भीषण अपघात झाला. (सर्व फोटो – पवन खेंग्रे/ इंडियन एक्सप्रेस)
-
रविवारी रात्री बाह्यवळण मार्गावर झालेल्या अपघातात टंँकर चालकाचे नियंत्रण सुटले. टँकरच्या धडकेने ४८ वाहनांचे नुकसान झाले.
-
या विचित्र अपघातात अपघातात जखमी झालेल्यांपैकी सात ते आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
रात्री उशीरा अपघात झालेल्या ठिकाणावरील वाहतूक सुरळीत करण्यात यंत्रणांना यश आलं.
-
जखमींची संख्या सुमारे ३५ ते ४० होती. किरकोळ जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
-
सध्या सात ते आठ जखमींवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
-
बाह्यवळण मार्गावर वेगाने निघालेल्या टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने रात्री नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला.
-
या दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर पुणे महानगर प्रादेशिक प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) अग्निशमन दल; तसेच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि हेल्प रायडर्स संघटनेच्या स्वयंसेवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
-
अपघातातील जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल केले. टँकरच्या धडकेमुळे ४८ वाहनांचे नुकसान झाले.
-
अपघातात दुचाकी, मोटारी, रिक्षा आणि टेम्पोचे मोठे नुकसान झाले.
-
अपघातानंतर बाह्यवळण मार्गावर मोठी कोंडी झाली होती.
-
बाह्यवळण मार्गावरुन टँकर मुंबईकडे वेगाने निघाला होता. नवले पुलाजवळ तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहनांना धडक दिली. रस्त्याच्या कडेला जाऊन टँकर धडकला.
-
अपघातानंतर परिसरात घबराट उडाली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
-
अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला काढण्यात आले. वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले.
-
याबाबत अधिक माहिती देताना सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी सांगितलं की, नवले पुलाजवळ भरधाव टँकरने धडक दिल्याने ४८ वाहनांचे नुकसान झाले आहे.
-
अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा चुराडा झाला आहे.
-
अनेक मोठ्या चारचाकी गाड्यांचंही नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे.
-
. अपघातात सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात कोणी मृत्यमुखी पडले नसल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
सर्व जखमींवर दीनानाथ मंगेशकर आणि नवले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
-
अपघातानंतर रस्त्यावर तेल सांडल्याने वाहतूक थांबवण्यात आली होती. हे तेल साफ करण्याचं काम रात्री उशीरापर्यंत सुरु होतं.
-
माती आणि खडी टाकून तेल साफ करण्यात आल्यानंतर वाहतुक सुरळीत करण्यात आली असं झोन क्रमांक तीनचे पोलीस उपायुक्त सोहेल शर्मा यांनी सांगितलं.
-
अनेक वाहने सोमवारी सकाळीही या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला उभी असल्याचं दिसून आलं.

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”