-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक ( आरएसएस ) डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केलं.
-
तसेच, आरएसएसचे दुसरे संघचालक माधवराव गोळवरकर यांच्या स्मृतींनाही मुख्यमंत्री शिंदेंनी अभिवादन केलं. यावेळी त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.
-
यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदेंनी म्हटलं, हे एक प्रेरणास्थान आणि स्फूर्तीस्थान आहे. बालपणी संघाच्या शाखेत गेलो होतो.
-
रेशीमाबगेत आल्यावर समाधान वाटलं. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही. शिवसेना आणि भाजपा एकत्र आहेत, असे एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
-
मुख्यमंत्री शिंदेंच्या रेशीमबागेतील भेटीवरून शिवसेना खासदार संजय राऊतांनी खोचक टोला लगावला आहे.
-
संजय राऊत म्हणाले, संघ विचारांचा रेशमी किडा त्यांच्या कानात आणि मनात पहिल्यापासून वळवळत आहे.
-
रेशीमबागेत जाणं चुकीचं नाही आहे. आरएसएस ही हिंदुत्ववादी विचारांची संघटना आहे.
-
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र जात असतील तर आनंद आहे, असं संजय राऊतांनी सांगितलं.
-
मुख्यमंत्री काही दिवसांनी सभागृहात खाकी पॅन्ट आणि काळी टोपी घालून येतील.
-
कारण, आरएसएस ही राष्ट्रीय बाण्याची संघटना आहे.
-
आम्ही त्यांच्यावर कधीही टीका केली नाही.
-
पण, पक्षांतर झालं आहे, इतक्या लवकर रक्तांतर होईल, असं वाटलं नव्हतं, असेही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या