-
केरळ सरकारच्या महत्त्वाकांक्षी कोची वॉटर मेट्रो मंगळवारी (२५ एप्रिल) रोजी सुरू झाली. (पीटीआय फोटो)
-
विशेष म्हणजे आशियातील ही पहिली वॉटर मेट्रो आहे. वॉटर मेट्रोद्वारे कोची शहर आणि आसपासची १० बेटं जोडली जाणार आहेत. (पीटीआय फोटो)
-
हा बहुचर्चित प्रकल्प १,१३६.८३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत आगामी काळात ३८ टर्मिनल्सवर ७८ इलेक्ट्रिक बोटी धावतील. (पीटीआय फोटो)
-
पहिल्या टप्प्यात कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या अंतर्गत आठ इलेक्ट्रिक हायब्रिड बोटी धावणार आहेत. (पीटीआय फोटो)
-
पहिल्या टप्प्यात हायकोर्ट-वायपिन टर्मिनल आणि व्यित्तला-कक्कनड टर्मिनल दरम्यान वॉटर मेट्रो धावेल. (पीटीआय फोटो)
-
प्रवासी कोणत्याही वाहतूक कोंडीचा सामना न करता अवघ्या २० मिनिटांपेक्षा कमी वेळात हायकोर्ट टर्मिनल ते वायपिन टर्मिनलपर्यंत पोहोचता येणार आहे.
-
हायकोर्ट-वायपिन टर्मिनलदरम्यानच्या प्रवासासाठी प्रवाशांना २० रुपये तिकीट असेल
-
व्यित्तला-कक्कनड टर्मिनलदरम्यान प्रवासासाठी प्रवाशांना ३० रुपये मोजावे लागतील.
-
आता प्रवासी माफक दरात प्रवासी वातानुकूलित वॉटर मेट्रोने प्रवास करू शकतील.

“मी १० वी नापास, तो बँकर…”, मराठमोळी अभिनेत्री पतीबद्दल म्हणाली, “मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी…”