-
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर आता शरद पवारांनी गुरुवारी (६ जुलै) दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेतली.
-
यावेळी शरद पवारांनी अजित पवारांनी उल्लेख केलेल्या २०१९ च्या आमदारांच्या सह्यांच्या पत्रासह अनेक आरोपांना प्रत्युत्तर दिलं. ते नेमके काय म्हणाले याचा हा आढावा…
-
एक गोष्ट खरी आहे की, २०१९ मध्ये काही लोकांनी त्यांच्या सह्यांचं एक पत्र दिलं होतं – शरद पवार
-
त्यात पक्षाचं पुढील धोरण काय असावं, कुणाबरोबर युती करावी यावर चर्चा करण्याची गरज आहे, असं म्हटलं – शरद पवार
-
त्यावर मी बैठक बोलावं असं म्हटलं होतं. मात्र, नंतर पुढे निवडणूक आली आणि त्यावर काहीही चर्चा झाली नाही – शरद पवार
-
मला पूर्ण विश्वास आहे की, २०१४ मध्ये महाराष्ट्रातील सत्ता बदलेल – शरद पवार
-
आज जे सत्तेत आहेत त्यांना लोक दूर करतील – शरद पवार
-
राज्यातील विरोधी पक्षांविरोधात ज्या प्रकारच्या गोष्टी करण्यात आल्या त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल – शरद पवार
-
जे महाराष्ट्रात सुरू आहे त्याबाबत मला आनंद आहे की, याची मोठी किंमत मतदारांना आश्वासन देऊन चुकीच्या मार्गावर गेलेल्यांना चुकवावी लागेल – शरद पवार
-
राज्यातील सत्तेत बदल होतील आणि जनता राष्ट्रवादी, काँग्रेस व उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या हातात सत्ता देतील – शरद पवार
-
अजित पवारांच्या बंडखोरीनंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा आहे. याबाबत महाराष्ट्रात होर्डिंगही लागत आहेत, असं लक्षात आणून देत शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला.
-
त्यावर शरद पवार स्मित हास्य करत म्हणाले, “चांगली गोष्ट आहे.” (सर्व छायाचित्र – संग्रहित)

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या