-
दिवाळी दणक्यात साजरी झाली आणि ती गोड झाली, याचं कारण भारतीय संघाने सेमीफायनल जिंकली. विराट कोहलीने आणखी एक विक्रम रचला. यासाठी विराट कोहलीचं अभिनंदन करतो, असं शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते ‘मातोश्री’त प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
-
“माझ्या पिढीला भाग्यवान समजतो. कारण, तीन पिढ्यांचे विक्रमवीर पाहिले आहेत. त्यात सुनील गावस्कर, सचिन तेंडूलकर आणि आता विराट कोहली आहे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
-
“विराटने अजूनही शिखर गाठलेलं नाही. पण, सर्वांना हवा हवासा आणि हेवा वाटेल, असा विक्रम विराटने रचावा,” अशी इच्छा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.
-
दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९८७ साली हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निवडणूक लढवली, त्यावेळी आमचे पाच ते सहा आमदार निवडणूक आयोगाने बाद ठरवले होते. तसेच बाळासाहेबांच्या मतदानावर देखील निवडणूक आयोगाने बंदी घातलेली होती.”
-
“मग, निवडणूक आचारसंहिता असताना रामलल्लाच्या मोफत दर्शनाचे आमिष दाखवणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निवडणूक आयोगाने नियमातून सूट दिली आहे का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
-
“निवडणूक आयोग जर विरोधी पक्षातील राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना त्यांच्या भाषणांवरून नोटीस पाठवत असेल. तर, ते काम करतायेत असं प्रथमदर्शनी वाटतंय. हेच काम अमित शाह यांच्या भाषनांनंतर ते करणार आहेत का? की त्यांच्यासाठी वेगळी आचारसंहिता निवडणूक आयोगाने तयार केली आहे?” असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

३६ व्या मजल्यावर नवीन घर! ‘ठरलं तर मग’ फेम अर्जुनची ‘ती’ इच्छा बाप्पाने पूर्ण केली; पत्नी श्रद्धा म्हणाली, “आम्ही दोघांनी…”