-
कालच्या दिवशी सकाळी (१७ जून) अतिशय धक्कादायक बातमी समोर आली. कंचनजंगा या एक्स्प्रेस रेल्वेला मागून आलेल्या मालगाडीने जोरदार टक्कर दिली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात काल संध्याकाळपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार ९ जणांचा दूर्दैवी मृत्यू झाला असून ६० हून अधिक लोक गंभीर जखमी आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर देशात होणारे रेल्वे अपघात आणि त्यातून केला जाणारा प्रवास सुरक्षा हे दोन्ही विषय चर्चेला आले आहेत. (ANI)
-
यानिमिताने आपण जाणून घेऊयात देशामध्ये आतापर्यंत झालेल्या मोठ्या रेल्वे अपघातांबद्दल. (ANI)
-
उत्तर प्रदेशमध्ये २० ऑगस्ट १९९५ ला झालेल्या भीषण अपघाताने तब्बल ४०० निष्पाप लोकांचा बळी घेतला होता. पुरुषोत्तम एक्स्प्रेस आणि कालिंदी एक्स्प्रेस या गाड्यांची समोरासमोर जोरदार टक्कर झाल्याने हा भयंकर अपघात घडला होता. (ANI)
-
६ जून १९८१ रोजी बिहारमध्ये एक भयंकर रेल्वे अपघात घडला होता. सुसाट वेगात असलेली एक रेल्वे बागमती नदीमध्ये कोसळली आणि त्यामुळे झालेल्या अपघातात ३०० जण ठार झाले. (ANI)
-
पंजाबमध्ये जम्मू तव-सियालदह रेल्वे अपघात घडला, हा अपघात २६ नोव्हेंबर १९९८ या दिवशी घडला आणि या दूर्दैवी घटनेने २१२ जणांचा बळी घेतला. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)
-
२ ऑगस्ट १९९९ कटिहार शहराच्या रेल्वेस्थानकाजवळ ब्रम्हपुत्रा मेल आसाम एक्स्प्रेसचा भीषण अपघात, या अपघातात २८५ जण दगावले. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)
-
२ जून २०२३ रोजी बालासोर रेल्वे अपघात घडला. ओडिशा राज्यातील हा सर्वात मोठा अपघात होता,यामध्ये २९८ लोकांचा मृत्यू झाला आहे. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)
-
गेल्या काही वर्षात सातत्याने घडत असलेले रेल्वे अपघात रोखणे हे सरकारसमोरचे आव्हान आहे. त्यासाठी कवच प्रणाली सारख्या काही तंत्रज्ञानावर आधारित संरक्षण प्रणालीही राबवली जात आहेत परंतु त्या किती प्रभावी ठरत आहेत हे अजून काही स्पष्ट झाले नाही. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)
-
अजून जास्त प्रभावी आणि परिणामकारक उपाययोजना आणने आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करणे हे रेल्वे प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)
-
(फोटो- लोकसत्ता संग्रहित) हेही पहा- PHOTOS : अपघात टाळण्यासाठी भारतीय रेल्वेनं विकसित केलेली ‘कवच’ प्रणाली काय आहे? जाणून घ्या

सरन्यायाधीश गवईंच्या भाच्याची मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदासाठी शिफारस; सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती म्हणाले, ‘मी असतो तर…’