-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमधील राजगीर येथे नालंदा विद्यापीठाच्या नवीन संकुलाचे उद्घाटन करणार आहेत. या माध्यमातून भारताच्या प्राचीन वारशाचे पुनरुज्जीवन करण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे. हे नवीन संकुल नालंदाच्या प्राचीन विद्यापीठाच्या अवशेषांजवळच आहे. (Indian Express)
-
एके काळी नालंदा विद्यापीठ हे जगातील सर्वात मोठे शैक्षणिक केंद्र होते. हे जगातील पहिले निवासी विद्यापीठ मानले जात होते जिथे विद्यार्थी आणि शिक्षक एकाच संकुलात राहून संशोधन करत होते. (Indian Express)
-
नालंदा विद्यापीठात इतकी पुस्तके होती की बख्तियार खिलजीने त्यांना जेव्हा आग लावली तेव्हापासून जवळपास तीन महिने ती जळत राहिली. याच बख्तियार खिलजीला नालंदा विद्यापीठाच्या आचार्यांनी मृत्यूपासून वाचवले होते. पण त्यानंतरही त्याने भारताचा हा प्राचीन वारसा नष्ट केला. त्याने तेथील धार्मिक विद्वान, पंडित आणि विद्यार्थ्यांची हत्याही केली. चला जाणून घेऊया बख्तियार खिलजीने असे का केले? (Indian Express)
-
पुढील माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला ही माहिती सांगणे गरजेचे आहे, की त्यावेळी नालंदा विद्यापीठात सुमारे १० हजार विद्यार्थी आणि २ हजार शिक्षक वास्तव्य करत होते. त्यांच्या ग्रंथालयात सुमारे ९० लाख पुस्तकांचा संग्रह होता. नालंदामधील विद्यार्थी तिथे वैद्यकशास्त्र, तर्कशास्त्र, गणितशास्त्र आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत होते. (Indian Express)
-
नालंदा विद्यापीठात केवळ भारतच नाही तर जपान, कोरिया, चीन, तिबेट, इंडोनेशिया, पर्शिया, तुर्की आणि जगातील अनेक देशांतील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत होते. (Indian Express)
-
नालंदा विद्यापीठावर बख्तियारच्या हल्ल्यापूर्वीही दोन हल्ले झाले होते पण ते तिसऱ्या हल्ल्याइतके विनाशकारी नव्हते. इसवी सन ११९३ मध्ये तुर्की सेनापती इख्तियारुद्दीन मुहम्मद बिन बख्तियार खिलजी याने नालंदा विद्यापीठावर सर्वात मोठा विनाशकारी हल्ला केला. (Indian Express)
-
असे म्हणतात त्याकाळी बख्तियार खिलजीने उत्तर भारतातील बौद्धांची सत्ता असलेला काही भाग काबीज केला होता. याच काळात तो इतका आजारी पडला की त्याच्या हकीमांनी हार पत्करली होती आणि काही दिवसातच त्याचा मृत्यू होईल असे भविष्यही वर्तविले होते. याच दरम्यान, कोणीतरी त्याला नालंदा विद्यापीठाच्या आयुर्वेद विभागाचे प्रमुख आचार्य राहुल श्रीभद्र यांच्याकडून उपचार घेण्याचा सल्ला दिला. (Indian Express)
-
खिलजीचा त्याच्या हकीमांवर इतर कोणाहीपेक्षा अधिक विश्वास होता, त्यामुळे तो नालंदाच्या आचार्यांकडून उपचार घेण्यास तयार नव्हता. आपले हकीम हे भारतीय वैद्यांपेक्षा अधिक सक्षम आणि जाणकार आहेत असे त्यास वाटे, पण शेवटी प्राण वाचवण्यासाठी आचार्य राहुल श्रीभद्र यांना पाचारण करण्यात आले. पण बख्तियार खिलजीने वैद्यराजांसमोर एक विचित्र अट ठेवली की त्यांनी दिलेले कोणतेही औषध खाणार नाही. (Indian Express)
-
वैद्यराजांनी त्याला औषधाविना बरे करावे, अशी बख्तियार खिलजीची अट होती. वैद्यराजांनी त्याची अट मान्य केली आणि काही दिवसांनी कुराण घेऊन त्याच्याकडे गेले. त्यांनी खिलजीस कुराणाची काही पाने वाचण्यास सांगितले. वैद्यराज आचार्य राहुल श्रीभद्र यांनी ही पाने वाचल्यानंतर बरे वाटेल आजारातून मुक्ती मिळेल, असे सांगितले. (Indian Express)
-
तेच झालं… कुराणाची ती पाने वाचून बख्तियार खिलजी बरा झाला. खरे तर, बख्तियार खिलजीला जे कुराण पुस्तक वाचायला सांगितले होते, त्याच्या पानांवर वैद्यराजांनी औषध लावले होते, असे सांगितले जाते. त्यामुळे खिलजी पुस्तकाची पाने तोंडाच्या थुंकी आणि बोटांच्या सहायाने पालटत असे तेव्हा पानांवरील औषध तोंडात जाऊन त्याचा एकप्रकारे औषधोपचार होऊन तो बरा झाला.
-
आता खिलजीला हे पाहून आश्चर्य वाटले की भारतीय विद्वान, आयुर्वेदाचे शिक्षक आणि शिक्षक आपल्या हकीमांपेक्षा अधिक जास्त ज्ञानी आणि सक्षम आहेत. ही गोष्ट त्याला खाऊ लागली. शेवटी बख्तियार खिलजीने भारतातून बौद्ध धर्म, ज्ञान आणि आयुर्वेदाची मुळे नष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने नालंदाच्या विद्यापीठाला आग लावली त्यामध्ये ग्रंथालयही होते आणि या आगीत सुमारे ९ दशलक्ष हस्तलिखित पुस्तके जळून राख झाली. (Indian Express)
-
इतिहासकारांच्या मते नालंदा विद्यापीठाच्या ग्रंथालयाला लागलेली आग तीन महिने धगधगत होती. यानंतर बख्तियार खिलजी आणि त्याच्या तुर्की सैन्याने नालंदाच्या हजारो धर्मपंडित, वैद्यशास्त्री आणि भिक्षूंनाही जाळून मारले. (Indian Express) हेही वाचा- Kanchanjunga Express Accident: सिग्नलमधील बिघाड आणि अनियंत्रित वेग; ‘या’ कारणांनी झाल…

पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्