-
तसे तर जगभरातून लाखो मुस्लिम दरवर्षी हज यात्रेसाठी रवाना होत असतात. हज यात्रा तशी फार कठीण मानली जाते. परंतु प्रत्येक मुस्लिम बांधव जीवनात एकदातरी हजवारी करण्यात धन्यता मानतो. असं असलं तरी ही यात्रा हरेकाला सोपी जाईल असं नाही. त्यामुळं आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार २०२४ मध्ये हजयात्रा करताना जवळपास ५५० लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उष्णतेच्या तडाख्यात सापडल्यामुळे हे मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. वाढलेल्या प्रचंड तापमानामुळे या यात्रेकरूंना आपले प्राण गमवावे लागले आहेत. (AP)
-
अजूनपर्यंत सौदी प्रशासनाकडून मृतांची अधिकृत अशी संख्या दिली गेली नाही परंतु माध्यमांतील प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत ३२३ इजित्पमधील, ४१ जॉर्डनवासी आणि ३५ ट्युनिशियन यात्रेकरूंचा उष्णतेशी संबधीत आजारांमुळे मृत्यू झाला आहे. (AP)
-
सौदीच्या हवामान विभागाने १८ जून रोजी असे जाहीर केले की मक्का आणि त्याच्या आसपासच्या ठिकाणांवर तब्बल ४७ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले आहे. (AP)
-
दरम्यान, यात्रेकरूंनी तापत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्र्या वापरल्या. सौदी अधिकाऱ्यांकडून तसा सल्लाही दिला गेला, तसेच रहिवासी नागरिकांनी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे असे सांगण्यात आले आहे. (AP)
-
या भीषण उकाड्याचा फटका विशेषतः वृद्ध यात्रेकरूना बसला. त्यांना वैद्यकीय मदतीची गरज भासली. वेळेवर न मिळालेल्या वैद्यकीय मदतीमुळे उन्हाच्या झळा लागून त्यांना मृत्यू पहावा लागला. त्यानंतर नातेवाईकांनी विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्या यात्रेकरूंचा शोध घेतला. (AP)
-
दरम्यान या सगळ्यात उन्हाचा तडाखा लक्षात घेत धार्मिक परंपरा असलेल्या गोष्टी आटोपून घेत १८ जून रोजी यात्रेकरूंनी काबा याठिकाणी प्रदक्षिणा घातल्या. (AP)
-
मुस्लिम धर्माच्या परंपरेनुसार हजचा समारोप ईदच्या दिवशी झाला,(AP)
-
२०२४ मध्ये १.८३ दशलक्षपेक्षा अधिक मुस्लिमांनी हज केले, ज्यात २२ देशांतील १६ लाखांहून अधिक यात्रेकरू आणि २ लाखांहून अधिक सौदी नागरिकांचा समावेश असल्याची माहीती सौदीच्या हज अधिकाऱ्यांनी दिली. (REUTERS) हेही पहा- PHOTOS : दिल्लीमध्ये उन्हाच्या कडाक्याचा प्राण्यांवरही परिणाम; संरक्षणासाठी वाघांनी शोधली सावली तर माकड लागले पोहायला! पहा फोटो

बापरे! महिलांनो बाजारातून कढीपत्ता घेताना सावधान! “हा” VIDEO पाहाल तर झोप उडेल; यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल