-
१८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदारांनी शपथ घेतली. सोमवार आणि मंगळवारी ५३५ सदस्यांनी शपथ घेतली असून ७ जणांची शपथविधी प्रक्रिया पूर्ण करणे बाकी आहे. (PTI Photo)
-
राहुल गांधी यांच्या शपथविघीदरम्यान काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी ‘भारत जोडो’चा नारा दिला. यावेळी काँग्रेस नेते आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांनी हातातील संविधान दाखवले. (PTI Photo)
-
भाजप नेते ओम बिर्ला, ज्यांना स्पीकर पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे, त्यांनीही शपथ घेतली. लोकसभा अध्यक्षपदासाठी ते काँग्रेसचे खासदार के सुरेश यांच्या विरोधात लढतील. (PTI Photo)
-
तृणमूल काँग्रेसचे (TMC) राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनीही खासदार म्हणून शपथ घेतली. काही दिवसांआधी त्यांनी जाहीर केले होते की ते काही वैद्यकीय कारणांमुळे” राजकीय आणि संघटनात्मक कामातून थोडा विश्राम घेत आहेत. (PTI Photo)
-
आझाद समाज पक्ष (कांशीराम) आणि नगीना मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार चंद्रशेखर आझाद संसद भवन संकुलात शपथ घेताना दिसत आहेत. ‘जय भीम, जय भारत, जय संविधान, जय जवान, जय किसान’ या जयघोषाने त्यांनी शपथेची सांगता केली. (PTI Photo)
-
अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणारे अरुण गोविल आणि हेमा मालिनी यांनीही खासदार म्हणून शपथ घेतली. (PTI Photo)
-
काँग्रेस खासदार किशोरी लाल शर्मा यांनी १८ व्या लोकसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संसदेत सदस्य म्हणून शपथ घेतली. अमेठीमध्ये भाजपाच्या स्मृती इराणींविरुद्ध त्यांनी मोठा विजय मिळवला. (PTI Photo)
-
खासदार ओवेसी यांनी शपथविधीदरम्यान पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शविल्याच्या वादग्रस्त विधानानंतर भाजपाचे रवी किशन यांनी शपथ घेतली. किशन यांनी त्यांची शपथ भोजपुरीमधील महादेव मंत्राने संपवली आणि यामध्ये अनेक खासदार सामील झाले. (PTI Photo)
-
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव १८ व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेताना भारतीय राज्यघटनेची प्रत दाखवली. (PTI Photo)
-
अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनीही शपथ घेतली. डिंपल यांनी मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या जयवीर सिंह यांचा पराभव केला आहे. (PTI Photo)
-
माजी क्रिकेटपटू आणि तृणमूलचे खासदार युसूफ पठाण यांनीही लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. या वर्षाच्या सुरुवातीला, मुर्शिदाबादमध्ये, त्यांनी आपल्या मतदारसंघातील बहुतेक सदस्यांना नोकरी देण्याचे वचन दिले आहे. (PTI Photo)
-
TMC खासदार महुआ मोईत्रा यांनी आज १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली. (PTI Photo)
-
त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार बिप्लब कुमार देब यांनी १८ व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. (PTI Photo)
-
द्रमुकच्या नेत्या कनिमोझी करुणानिधी यांनी थुथुकुडी येथून लोकसभा खासदार म्हणून शपथ घेतली. त्या तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या बहीण आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांच्या कन्या आहेत. (PTI Photo)
-
शिरोमणी अकाली दलाच्या पंजाबमधील (एसएडी) भटिंडा येथील खासदार हरसिमरत कौर बादल यांनी संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शपथ घेतली. , त्या माजी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री आहेत. (PTI Photo)
-
शिवसेना उबाठा गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आई वडील आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्मरून शपथ घेतली परंतु अध्यक्षांनी त्यांना परत शपथ घेण्यास सुरुवात करण्याची विनंती केली. दरम्यान महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी जयभीम, जय शिवराय, तसेच रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र अशा घोषणांनी शपथविधी संपवले.

‘या’ भयंकर आजारानं शिरीष गवसचा मृत्यू; सुरुवातीलाच दिसतात ६ जीवघेणी लक्षणे, दुर्लक्ष न करता लगेच जाणून घ्या