-
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३३९ वा पालखी सोहळा आज पार पडणार आहे.
-
देहूमध्ये आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे.
-
१९ दिवसांचा प्रवास करून हा पायी पालखी सोहळा १६ जुलै रोजी पंढरीत दाखल होईल.
-
१७ ते २० जुलै रोजी हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे.
-
वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा झाली आहे. यंदा पालखी सोहळ्याचे ३३९ वे वर्ष आहे.
-
पालखी सोहळा प्रमुख म्हणून विशाल मोरे, माणिक मोरे, संतोष मोरे महाराज यांची निवड करण्यात आली आहे.
-
प्रस्थान ठेवल्यानंतर इनामदार वाड्यात पालखी सोहळा पहिला मुक्काम करणार आहे.
-
संत तुकारामांची पालखी १६ जुलै रोजी पंढरीत दाखल होणार असून १७ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या सोहळ्यात पालखी सोहळ्यातील वारकरी सहभाग घेणार आहेत. आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा झाल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण आहे.
-
आज म्हणजेच २८ जूनला दुपारी दोन वाजता पालखी प्रस्थान होणार असून पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असेल. २९ जूनला पालखी सोहळा आकुर्डीत मुक्कामी असणार आहे. ३० जूनला पालखी पुण्यात दाखल होणार असून दोन दिवस नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असणार आहे.
-
२ जुलैला पालखी सोहळा लोणी काळभोरला, ३ जुलैला, ४ जुलैला वरवंड, ५ जुलैला उडंवडी गवळ्याची, ६ जुलैला बारामती शारदा विद्यालय, ७ जुलैला सणसर पालखी तळ, ८ जुलैला पालखी आंथुर्णेत मुक्कामी असून बेलवाडीत दुपारी पहिले गोल रिंगण होणार आहे.
-
९ जुलैला निमगाव केतकी, १० जुलैला इंदापूर पालखी तळावर मुक्काम असून दुपारी गोल रिंगण होणार आहे. ११ जुलैला सराटी पालखी तळ, १२ जुलैला अकलूज माने विद्यालय पालखी तळावर मुक्कामी असून दुपारी गोल रिंगण होणार आहे.
-
१३ जुलैला बोरगाव येथे मुक्कामी असून दुपारी माळीनगर उभे रिंगण होणार आहे. १४ जुलैला पिराची कुरोली, १५ जुलैला वाखारीला उभे रिंगण होणार आहे. १६ जुलैला श्री क्षेत्र पंढरपूर संत तुकाराम महाराज नवीन इमारत येथे पालखी सोहळा दाखल होणार असून या ठिकाणी उभे रिंगण होणार आहे.
-
१७ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या सोहळ्यात पालखी सोहळ्यातील वारकरी सहभाग घेणार आहेत. चार दिवसांच्या पंढरीतील मुक्कामानंतर २१ जुलैला पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.
-
हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूत दाखल होत असतात. यंदाही लाखो भाविक हा क्षण प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी देहू येथे दाखल झाले आहेत.
-
काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून देहूत मोठा पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी स्वतः देहूत जाऊन सुरक्षेबाबत आढावा घेतला.
-
दरवर्षी देहू आणि आळंदीत पालखी सोहळ्यात चोरटे सक्रिय असतात. ग्रामीण भागातून आलेल्या वारकऱ्यांना याचा फटका बसू शकतो, हे लक्षात घेऊन देहू आणि आळंदीत ठिकठिकाणी सीसीटीव्ही तसेच पोलीस हे वारकऱ्यांच्या वेशभूषेत, खाकी गर्दीत फिरणार आहेत. (सर्व फोटो : कृष्णा पांचाळ/लोकसत्ता)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”