-
बांगलादेशातील शेख हसीना यांचे सरकार कोणी पाडले? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. काहीजण यासाठी पाकिस्तान आणि अमेरिकेला दोष देत आहेत, तर काही जण काही वेगळेच सांगत आहेत, पण यामागे सर्वात मोठा हात आहे नाहिद इस्लामचा, ज्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. जाणून घेऊया कोण आहे नाहिद इस्लाम? (Reuters)
-
बांगलादेशात निदर्शने आणि हिंसाचाराचे मुख्य कारण सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण हे आहे हे सर्वांनाच माहीत आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबासाठी हा कोटा (३० टक्के) रद्द करण्याची मागणी करत शेख हसिना यांच्या सरकारविरोधात विद्यार्थ्यांनी प्रचंड निदर्शने केली. नाहिद इस्लाम या विद्यार्थ्यांचा लीडर आहे. (Reuters)
-
बांगलादेशातील शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्यामागे विद्यार्थी नेता नाहिद इस्लाम हा व्यक्ती कारण ठरला आहे. नाहिद इस्लाम ‘स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन’ या विद्यार्थी संघटनेचा समन्वयक आहे. (Reuters)
-
नाहिद इस्लाम एक समाजशास्त्राचा विद्यार्थी आहे, त्याने बांगलादेशातील आंदोलनाचे नेतृत्व केले. २६ वर्षीय नाहिद इस्लाम अनेकदा कपाळावर बांगलादेशचा झेंडा बांधून या आंदोलनात अनेकवेळा अनेक ठिकाणी दिसला आहे. (Reuters)
-
जुलैच्या मध्यात निदर्शने तीव्र होत असताना पोलिसांनी नाहिद इस्लाम आणि ढाका विद्यापीठातील इतर काही विद्यार्थ्यांना अटक केली होती. यानंतर तो विद्यार्थ्यांचा हिरो बनला आणि संपूर्ण बांगलादेशातील लोक त्याला पाठिंबा देऊ लागले. (Reuters)
-
सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे ज्यामध्ये पोलीस नाहिद इस्लामला कारमध्ये बसवत आहेत. त्यानंतर २४ तासांनंतर तो एका पुलाखाली बेशुद्धावस्थेत सापडला. तो बेशुद्ध होईपर्यंत पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचा दावा त्याने केला होता. (PTI)
-
नाहिद इस्लामचे म्हणणे आहे की विद्यार्थी, सैन्याच्या नेतृत्वाखालील किंवा लष्कर समर्थित कोणतेही सरकार स्वीकारणार नाहीत. (Reuters)
-
यासह नाहिदने बांगलादेशी अर्थशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांना देशाचे पंतप्रधान बनवण्याची मागणीही केली आहे. (Reuters)
-
मुहम्मद युनूस यांना सोडून इतर कोणतेही सरकार विद्यार्थी स्वीकारणार नाहीत, असे नाहिद इस्लामचे म्हणणे आहे. (Reuters)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”