-
‘विकसित भारत’चे उद्दिष्ट गाठण्यासाठी अशा लोकांनी स्वातंत्र्य लढ्यात दाखवलेले चैतन्य पुन्हा आवश्यक असल्याचे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मध्ये केले.
-
स्वातंत्र्यदिनी एक लाख तरुणांना कोणत्याही राजकीय पार्श्वभूमीशिवाय राजकारणात येण्याचे आवाहन केले होते. त्यावर काही तरुणांनी घराणेशाहीचे राजकारण नवीन प्रतिभेला चिरडत असल्याचा दावा केल्याचे मोदींनी या वेळी नमूद केले.
-
सामूहिक प्रयत्नांतून राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना राजकारणात प्रवेश करण्यात मदत होईल.
-
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “यावर्षी लाल किल्ल्यावरून मी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एक लाख तरुणांना राजकीय व्यवस्थेशी जोडले जाण्याचे आवाहन केले.”
-
“माझ्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आमच्या लक्षात आले की तरुण मोठ्या संख्येने राजकारणात प्रवेश करण्यास उत्सुक आहेत.”
-
“ते फक्त योग्य संधी आणि योग्य मार्गदर्शनाच्या शोधात आहेत. मला देशभरातून तरुणांचे यासंदर्भात अनेक पत्रे मिळाली.”
-
“समाज माध्यमावरूनही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच नागरिकांनीही मला अनेक सूचना केल्या आहेत.”
-
“त्यांचे आजोबा किंवा पालक यांच्याकडून राजकीय वारसा नसल्यामुळे इच्छा असूनही राजकारणात प्रवेश करता आला नाही,” असे त्यांनी सांगितल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
-
“काही तरुणांनी लिहिले आहे, की त्यांना नागरिकांमध्ये काम करण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे ते लोकांच्या समस्या सोडवण्यास उपयुक्त ठरू शकतात.”
-
“काही तरुणांनी घराणेशाहीचे राजकारण नवीन प्रतिभेला चिरडत असल्याचे नमूद केले. तर काही तरुणांनी लोकशाहीला अधिक बळ मिळेल,” असे सांगितले.
-
“या विषयावर सूचना पाठवल्याबद्दल मी प्रत्येकाचे आभार मानतो,” असे मोदी म्हणाले.
-
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)

HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत