-
हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे.
-
याचदरम्यान, विनेश फोगट जुलाना विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.
-
विनेश फोगट काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवत होत्या.
-
विनेश यांनी भाजपाच्या योगेश कुमार यांचा पराभव केला आहे.
-
या विजयानंतर विनेश यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
-
“नेहमीच संघर्षाचा मार्ग निवडणाऱ्या प्रत्येक मुलीचा आणि स्त्रीचा हा विजय असून देशाने दिलेले प्रेम मी सदैव जपून ठेवीन”, अशी भावना विनेशने यावेळी व्यक्त केली आहे.
-
तसेच ति पुढे म्हणाली, “आता अजून काही वेळ वाट पाहूयात, निकालाचे सर्व चित्र स्पष्ट झाले नाही. परंतु प्रमाणपत्र हाती आल्यावर राज्यात कॉँग्रेस पक्षच सत्ता स्थापन करेन. आता मी राजकीय जीवनात आले आहे आणि इथेच राहीन.”
-
दरम्यान, विनेशला ६०१५ मतांनी हा विजय मिळाला आहे.
-
तर भाजपाचे उमेदवार योगेश कुमार यांना ५९०६५ मते मिळाली.
-
तिला एकूण ६५०८० इतकी मते मिळाली. (सर्व फोटो- संग्रहित छायाचित्र लोकसत्ता)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या