-
Omar Abdullah to take oath today, J&K gets elected government after 10 years : ओमर अब्दुल्ला आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनी सरकार निवडून आले.
त्यानंतर आता ओमर अब्दुल्ला आज म्हणजे १६ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. -
जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने ४८ जागा जिंकल्या. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी ओमर अब्दुल्ला यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले आहे.
-
आज रोजी सकाळी ११.३० वाजता हा शपथविधी सोहळा सुरू होईल. दरम्यान कोण आहेत जम्मू-काश्मीरचे होणारे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, चला जाणून घेऊ.
-
ओमर अब्दुल्ला यांनी १९९८, १९९९ आणि २००४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये श्रीनगर मतदारसंघातून निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.
-
त्यांनी २००२ मध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला.
-
२००९ मध्ये ते जम्मू-काश्मीरचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री बनले आणि २०१५ पर्यंत या पदावर होते.
-
त्यांचे वडील फारुख अब्दुल्ला तसेच आजोबा शेख अब्दुल्ला हे दोघेही जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
-
उमर अब्दुल्ला यांचे शिक्षण श्रीनगरच्या Burn Hall School मध्ये झाले, नंतर त्यांनी मुंबईतील Sydenham College of Commerce मधून बीकॉम पूर्ण केले आणि स्कॉटलंडच्या University of Strathclyde येथून MBA केले.
-
ते बडगाम विधानसभा मतदारसंघातून या निवडणुकीत विजयी झाले. बडगाम हा देखील श्रीनगर लोकसभा मतदारसंघाचाच भाग आहे.
-
(सर्व फोटो साभार- ओमर अब्दूल्ला सोशल मीडिया)
हेही वाचा- लॉरेन्स बिश्नोई टोळी ‘डी कंपनी’च्या वाटेवर?; हाजी मस्तान, करीम लाला ते अरुण गवळी ‘या’…

शनीदेव निघाले तांब्याच्या पावलांनी; २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात होणार मोठ्या उलाढाली? काय होणार तुमच्या नशिबाचे?