-
काल राज्यात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाली.
-
माहिम मतदारसंघातून अमित ठाकरे यांचा पराभव झाला आहे.
-
तर त्यांचे बंधू आदित्य ठाकरेंनी वरळीतून विजय मिळवला आहे.
-
दोघांनी त्यांच्या निकालानंतर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
आदित्य ठाकरे यांना ६३ हजार ३२४ मते मिळाली, त्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.
-
राज्याच्या निकालावर आदित्य ठाकरे म्हणाले
अपेक्षित असे निकाल आले नाहीत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच यात महाराष्ट्राने मतदान केले आहे की ईव्हीएमने मतदान केले आहे हा एक मोठा प्रश्न आहे. यावर नंतर चर्चा करू असेही ते म्हणाले. यात ईव्हीएमने किती प्रचार केला हेही पाहितलं पाहिजे. अपेक्षित निकाल होते तो लागला नाही. त्यामुळे टेक्निकल गोष्टींवर चर्चा व्हायला पाहिजे, असेही ते म्हणाले. -
माहिम मतदारसंघातून अमित ठाकरे यांच्या पराभवानंतर त्यांनी आपला पराभव मान्य केला आहे. त्यांना ३३,००० मते मिळाली.
-
“जनतेचा कौल मला मान्य आहे. माझी ही लढाई कधीच सत्ता मिळवण्यासाठी नव्हती. कारण ही लढाई कोणा राजपुत्राची नसून ती एका सामान्य कार्यकर्त्याची होती”, असे अमित ठाकरे म्हणाले आहेत.
-
दरम्यान, माहिम मतदारसंघातून महेश सावंत विजयी झाले आहेत. ते ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार आहेत.
-
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
हेही पहा – Photos : विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर अजित पवार कुटुंबीयांनी उधळला गुलाल

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या