-
महाराष्ट्राच्या एटीएस पथकाने ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील पडघ्यात आज मोठी कारवाई केली. (फोटो: सग्रहित छायाचित्र)
-
सकाळी एटीएसची २२ पथके पडघा गावामध्ये पोहोचली होती. एटीएसने २२ ते २३ संवेदनशील ठिकाणांवर छापेमारी केली. (फोटो: सग्रहित छायाचित्र)
-
या छापेमारीत विविध संवेदनशील माहिती हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एटीएसच्या पथकाने कुख्यात दहशतवादी साकिब नाचणच्या घरावर देखील छापे टाकले आहेत. त्यामुळे मोठा दहशतवादी कट उधळल्याची चर्चा आहे. दरम्यान, कोण आहे हा साकिब नाचण? जाणून घेऊ… (फोटो: सग्रहित छायाचित्र)
-
कोण आहे साकिब नाचण?
साकिब नाचण हा पडघ्यातील बोरीवली गावात राहातो. त्याला आतापर्यंत तीन वेळा अटक झाली आहे. (फोटो: सग्रहित छायाचित्र) -
एटीएस पथकाने ज्या साकिब नाचणच्या घरावर छापा टाकला तो भारतात बंदी घातलेल्या स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडियाचा (सिमी) दहशतवादी आहे. साकिबला यापूर्वी दोन दहशतवादी हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. (फोटो: सग्रहित छायाचित्र)
-
शिक्षा
गुजरातमधील ‘टाडा’ न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. परंतु पाच वर्षे तुरुंगात राहिल्यावर नाचणची सुटका झाली. (फोटो: सग्रहित छायाचित्र) -
बॉम्बस्फोटांमध्ये सहभागी
साकीब नाचणने २००२-२००३ मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, विलेपार्ले आणि मुलुंड इथं बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक निष्पापांचा जीव गेला होता. (फोटो: सग्रहित छायाचित्र) -
ही अटक आलेली चर्चेत
मार्च २००३ मध्ये प्रदीप शर्मा, दया नायक आणि सचिन वाझे यांचे विशेष पथक साकिब नाचण याला अटक करण्यासाठी गेले होते. साकिबला पोलीस घेऊन जात असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर काही ग्रामस्थ साकिबच्या घराजवळ दाखल झाले. त्यांनी पोलिसांच्या पथकाला साकिबला नेण्यापासून विरोध केला. त्यामुळे पोलीस पथकाला रिकाम्या हाताने परताने लागले होते. काही दिवसांनी साकिब नाचण पोलिसांच्या शरण आला. -
साकिब नाचण हा आयसिस माॅड्यूलचा म्होरक्या असल्याचा दावाही आता केला जात आहे. (फोटो: सग्रहित छायाचित्र)

पावसाळ्यात घरात बाथरुममधून गोम, गांडूळ येतात? मग फॉलो करा फक्त ‘या’ 3 ट्रिक्स, पुन्हा दिसणार नाही