-
Air India Plane Crash Ahmedabad Gujarat: गुजरातच्या मेघानीनगर परिसरात आज एअर इंडियाचे AI171 प्रवासी विमान कोसळले.
-
अपघातग्रस्त झालेले विमान हे आंतरराष्ट्रीय प्रवासाचे विमान असल्याचे सांगितले जात आहे.
-
अहमदाबादहून लंडनच्या दिशेने या विमानाने टेकऑफ केले होते.
-
टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही वेळातच विमान अपघातग्रस्त झाले.
-
या विमानातून २४२ प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती देणारी पोस्ट एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
-
हे विमान गुजरातच्या B J मेडिकल हॉस्टेलमध्ये कोसळले.
-
घटनास्थळी बचावकार्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या मोठ्या संख्येने दाखल झाल्या असून एसडीआरएफची तीन पथकंही दाखल झाली आहेत.
-
तांत्रिक बिघाडामुळे हे विमान अपघातग्रस्त झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
-
या विमानात १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते.
-
अपघातात जखमी झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. (सर्व फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Ahmedabad Plane Crash: ‘MAYDAY’… अहमदाबादमध्ये विमान कोसळण्याच्या काही क्षण आधी वैमानिकाचा संदेश!