-
हिमाचल प्रदेशमध्ये मान्सूनने कहर केला असून सततच्या पावसामुळे येथे २३ पूर, १९ ढगफुटी आणि १६ भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी भीषण परिस्थिती आहे. यामध्ये ७ जुलैपर्यंत, किमान ७८ लोकांचा मृत्यू झाला आहे, ३७ लोक बेपत्ता आहेत आणि ११५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. मंडी जिल्हा सर्वात वाईट परिस्थिती आहे. राज्यात अंदाजे ५७० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, रेड अलर्ट अजूनही लागू आहे, ज्यामुळे आणखी विनाश होण्याची भीती निर्माण झाली आहे
-
.भाजप खासदार कंगना राणौत रविवारी मंडीतील कारसोग येथे आपत्तीग्रस्त भागांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. (@KanganaTeam X/ANI फोटो)
-
६ जुलै २०२५ रोजी (रविवार) मंडी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात नुकसान झालेल्या घरांजवळील कचरा आणि गाळ साचल्याचे पाहायला मिळाले. (पीटीआय फोटो)
-
रविवार, ६ जुलै २०२५ रोजी मंडी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात बचाव कार्य सुरू होते. (पीटीआय फोटो)
-
शनिवारी मंडी येथे ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त कारचे दृश्य. (एएनआय फोटो)
-
शनिवारी मंडीमध्ये ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या कार आणि घरांचे अवशेष. (एएनआय फोटो)
-
हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी शनिवारी मंडी येथील ढगफुटीग्रस्त सेराज व्हॅलीला भेट दिली. (एएनआय फोटो)
-
शनिवारी मंडीमध्ये ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त इमारतीचे दृश्य. (एएनआय फोटो)
-
शनिवार, ५ जुलै २०२५ मंडी जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे निवासी भागातील इमारतींचे प्रचंड नुकसान झाल्याचे . (पीटीआय फोटो)
-
शनिवारी मंडी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला ज्यामुळे निवासी भागात अनेक घरे कोसळली. (पीटीआय फोटो)
-
शुक्रवारी मंडी येथील सेराज खोऱ्यातील ढगफुटी झालेल्या भागात मदत आणि बचाव कार्य करत असताना एनडीआरएफचे जवान एका तात्पुरत्या पुलावरून चालत जातानाचे दृष्य. (एएनआय फोटो)

Video : डॉक्टरने भर रस्त्यावर स्वतःला पेटवून घेतले! अकोल्यात मृत्यूशी झुंज, नांदुरा परिसर हादरला