-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज अर्थात जागतिक वारसा हा दर्जा मिळाला आहे. त्यातला पहिला किल्ला आहे रायगड. रायगड या किल्ल्याचं महत्त्व अनन्य साधारण आहे. (सर्व फोटो सौजन्य-लोकसत्ता ऑनलाइन)
-
रायगड किल्ला म्हणजे स्वराज्याची राजधानी, शिवाय या किल्ल्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे कारण याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे
-
राजगड किल्ला मध्ययुगीन स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना आहे. सुमारे ४० किलोमीटर परिघ असलेल्या या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची १३७६ मीटर आहे. भक्कम तटबंदी आणि सुयोग्य रचना यामुळे हा किल्ला संरक्षण आणि प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला.
-
शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून १०५ किलोमीटरवर आहे
याच किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. -
महाबळेश्वर पासून महाड रस्त्याला २१ कि.मी.अंतरावर प्रतापगड आहे. दि.१० नोव्हे.१६५९ रोजी या किल्ल्यावर छ. शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात सर्वात मोठी लढाई झाली होती, त्यामुळे या किल्ल्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.
-
लोहगड किल्ला हा पुणे जिल्ह्यातील लोणावळा जवळ वसलेला आहे. हा किल्ला १,०३३ मीटर (३,३८९ फूट) उंचीवर आहे आणि त्याला “लोखंडी किल्ला” असेही संबोधले जाते. किल्ल्याचा इतिहास तेराव्या शतकापासून सुरू होतो.
-
पन्हाळगड हा स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. कोल्हापूरची गादी स्थापन करणाऱ्या महाराणी ताराराणी यांनी आपली राजधानी काही वर्षे येथेच ठेवली होती.
-
खांदेरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला आहे. खांदेरीचा दुर्ग हा काही फार प्रसिद्ध दुर्ग नव्हे; पण हे बेट मुंबईच्या समोरच असल्याने अतिशय मोक्याचे आहे. इ.स. १६७९ च्या ऑगस्ट महिन्यात शिवाजी महाराजांनी मायनाक भंडाऱ्याला येथे पाठवून बेटावर किल्ला बांधला
-
इ.सन १६७१-७२ मध्ये शिवाजी महाराजांनी साल्हेरचा दुर्ग जिंकला. साल्हेरच्या युद्धाचा मोगलांच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. तेव्हापासून ते शिवाजी महाराज अजिंक्य आहे असे मानू लागले.
-
जिंजीचा किल्ला हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक किल्ला आहे. ह्या किल्ल्याला राजगड आणि रायगडनंतर स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीच्या मदतीने हिंदवी स्वराज्याची पुनः प्रतिष्ठापना केली.
-
सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४-१६६७ मध्ये बांधलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला अरबी समुद्रातील एका छोट्या बेटावर स्थित आहे आणि त्याचे क्षेत्रफळ सुमारे ४८ एकर आहे.
-
सुवर्णदुर्गाचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून उत्तराभिमुख आहे. हे प्रशस्त प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतले आहे. महाद्वाराजवळ पोहोचताच पायरीवर कासवाची प्रतिमा कोरलेली आहे.
-
विजयदुर्ग हा किल्ला ११ व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला. पुढे तो बहामनी व नंतर आदिलशाहीच्या ताब्यात होता. टॅव्हेरनिअर याने इ.स. १६५०मध्ये या किल्ल्याला भेट दिली होती. तेव्हा त्याने त्याचे वर्णन ‘विजापूरकरांचा अभेद्य किल्ला’ असे करून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला.[२] कान्होजी आंग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळोजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला इ.स. १७५६पर्यंत होता.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल