-
भारताचे १४ वे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी २०२२ मध्ये पदभार स्वीकारला होता आणि २०२७ मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता.
-
त्यांच्या अनपेक्षित राजीनाम्याने केवळ त्यांच्या राजकीय प्रवासाकडेच नव्हे तर त्यांच्या सुरुवातीच्या वर्षांकडे, विशेषतः त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीकडेही लक्ष वेधले गेले आहे.
-
राजस्थानातील चित्तोडगड येथील आर्मी स्कूलमधील शिक्षण घेण्यापासून राजस्थान विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवण्यापर्यंत, धनखड यांच्या शिक्षणाने त्यांना कायदा, राजकारण आणि संवैधानिक जबाबदारी अशा कारकिर्दीसाठी तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
-
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, धनखड यांना शैक्षणिक आवड निर्माण झाली. त्यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी राजस्थान विद्यापीठात प्रवेश घेतला आणि विज्ञान विषयात पदवी पूर्ण केली.
-
राजस्थान विद्यापीठात त्यांनी एलएलबीची मिळवली, ज्यामुळे कायद्यातील आणि नंतर सार्वजनिक जीवनातील त्यांच्या कारकिर्दीचा पाया रचला गेला.
-
धनखड १९७९ मध्ये राजस्थान बार कौन्सिलमध्ये वकील बनले. १९९० मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने त्यांना वरिष्ठ वकील ही पदवी दिली. ३० जुलै २०१९ रोजी राज्यपाल होईपर्यंत त्यांनी राज्यातील सर्वात वरिष्ठ वकील म्हणून त्यांनी हे पद भूषवले.
-
१९८९ मध्ये जनता दलातून ते राजस्थानातील झुंझुनू येथून खासदार म्हणून निवडून आले आणि प्रवेश केला. नंतर १९९१ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील सहभागी झाले आणि १९९३ मध्ये किशनगड येथून राजस्थान विधानसभेची निवडणूक जिंकली आणि १९९८ पर्यंत ते कार्यरत राहिले.
-
२००३ मध्ये, धनखड यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. जुलै २०१९ मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे राजकीय महत्त्व वाढले. ते जुलै २०२२ पर्यंत या पदावर होते.
-
जुलै २०२२ मध्ये, धनखड यांना भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून नामांकित करण्यात आले. ६ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांनी ७१० वैध मतांपैकी ५२८ मते (७४.४%) मिळवून प्रचंड विजय मिळवला, जो अलीकडील उपराष्ट्रपती निवडणुकीत सर्वात मोठा विजय होता. (सर्व फोटो सौजन्य: @VPI/X)

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…