-
२६ जुलै २००५ हा दिवस मुंबईकर कधीच विसरु शकत नाहीत. कारण या दिवशी मुंबईने पावसाचं तांडव काय असतं ते पाहिलं होतं. (सर्व फोटो सौजन्य-इंडियन एक्स्प्रेस)
-
मुंबईत आलेल्या २६ जुलै २००५ च्या पुराला आज २० वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र या आठवणी एकाही मुंबईकराच्या मनातून पुसल्या गेलेल्या नाहीत. मुंबईच्या वेगाला ब्रेक लावणारा रेकॉर्डब्रेक पाऊस त्या दिवशी झाला होता.
-
मुंबईतील कुर्ला, सांताक्रूझ, अंधेरी, सायन, माटुंगा, घाटकोपर, धारावी यांसारख्या भागांमध्ये पाणी गळ्यापर्यंत भरलं होतं.
-
मुंबईतल्या सगळ्या प्रमुख वाहतूक मार्गांवर पूरस्थिती निर्माण झाली होती. रेल्वे सेवा पूर्ण ठप्प झाली, बस सेवा बंद पडली, रस्त्यांवर वाहनांच्या रांगा तास अन् तास उभ्या होत्या.
-
३० हजारांहून अधिक रिक्षा, ४ हजार टॅक्सी आणि ९०० बेस्ट बसेस या पावसात जलमय झाल्या होत्या. या महाभयंकर प्रलयानं घरं उद्ध्वस्त झाली आणि वेगवान मुंबईचा वेग थांबला होता.
-
२० वर्षांनंतरही त्या दिवसाच्या आठवणी मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. त्या दिवशी मुंबई आणि उपनगरांमध्ये इतका पाऊस झाला होता की त्या पावसामुळे मुंबईसह मुंबईची उपनगरं जलमय झाली होती.
-
शाळा-महाविद्यालयांत गेलेल्या विद्यार्थ्यांना घरी आणताना त्यांच्या पालकांची दमछाक झाली. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाल्याने रस्ते बंद झाले होते. तर, पावसाचे पाणी साचल्याने अनेक गाड्या अडकून पडल्या होत्या.
-
२६ जुलै रोजी १२ तासांत वरुणराजाने ९४४ मिमी पावसाची नोंद केली. दुसऱ्या दिवशीही त्याचं तांडव संपलेलं नव्हतं. हे तांडव शांत झालं तेव्हा १०९४ लोकांना जलसमाधी मिळाली होती.
-
मुंबईत एवढा मुसळधार पाऊस कोसळणार आहे, याचा अंदाज तेव्हा हवामान खात्यालाही आला नव्हता, त्यामुळे मुंबई निर्धास्त होती. पण नंतर ढगफुटीसारखा पाऊस झाला. ज्याचा परिणाम विमान सेवेवरही झाला होता.
-
अचानक ओढावलेल्या या परिस्थितीमध्ये प्रशासनही चक्रावून गेले होते. परंतु, त्याही परिस्थितीत जमेल तितकी मदत आणि बचावकार्य प्रशासनकडून सुरू होतं
-
बारवी धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने दिवा, डोंबिवली, कोपर, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर ही सगळी उपगनरं जलमय झाली होती.

“जेवढं मिळतंय त्यात आनंद मानायला शिका”; आयुष्यात सतत तक्रार करणाऱ्यांनो चिमुकलीचा ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी