-
लातूरमध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.
-
या पुतळ्याचे अनावरण काल ११ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
-
लातूर जिल्हा परिषदेच्या परिसरात हा पुतळा उभारण्यात आला आहे. या कार्यक्रमाला गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे व इतर मान्यवर उपस्थित होते. या पुतळ्याची वैशिष्ट्ये काय आहेत ते जाणून घेऊयात.
-
वजन
३४५१.६५ चौ.मी. एवढ्या जागेत पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याची उंची १२ फूट आहे. तर वजन ९०० किलो आहे. -
धातू
या पुतळ्याला बनवण्यासाठी उच्च दर्जाचा ब्रॉन्झ धातू वापरला आहे. या पुतळ्याचे शिल्पकार विजय बोंदर आहेत. -
खर्च
पुतळा निर्मिती व परिसराच्या सुशोभिकरणाला एकूण खर्च १ कोटी ५१ लाख रुपये आला आहे. -
विलासराव देशमुख यांचा पुतळा
आणखी एक खास गोष्ट म्हणजे या पुतळ्याच्या शेजारीच लातूरचे पुत्र आणि महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पुतळा देखील उभारण्यात आला आहे. त्यामुळे, दोन मित्रांचे पुतळे एकाच ठिकाणी उभारण्यात आल्याचं वेगळच समाधान जनतेमधून व्यक्त होत आहे. (सर्व फोटो साभार – पंकजा मुंडे इन्स्टाग्राम) हेही पाहा- देशाला हजारो टन सोनं देणाऱ्या भारतातल्या ५ सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणी कुठे आहेत? जाणून घ्या…

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”