-
महाराष्ट्र सरकारने २ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरंगे पाटील यांची “हैदराबाद गॅझेट” लागू करण्याची मागणी मान्य केली आहे.
-
दरम्यान, या आंदोलन काळात मनोज जरांगे पाटील सतत “हैदराबाद गॅझेट”चा उल्लेख करत होते. स्वातंत्र्यापूर्वी, महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांचा समावेश असलेला मराठवाडा हैदराबादच्या निजामाच्या राज्याचा भाग होता.
-
हैदराबाद गॅझेटमध्ये १९१८ मध्ये तत्कालीन हैदराबादच्या निजामाने जारी केलेल्या आदेशाचा उल्लेख आहे. यात या प्रदेशाच्या लोकसंख्या, जाती आणि समुदाय, व्यवसाय, शेती इत्यादींशी संबंधित सर्व नोंदी हैदराबाद समावेश आहे.
-
दरम्यान हैदराबाद गॅझेट निजाम मीर उस्मान अली खान यांच्या कार्यकाळात लिहिले गेले होते. ६ एप्रिल १८८६ रोजी जन्मलेले मीर उस्मान अली खान बहादूर हे हैदराबाद आणि बेरार संस्थानाचे शेवटचे निजाम होते. खान यांचे २४ फेब्रुवारी १९६७ रोजी निधन झाले. भारताने हैदराबाद ताब्यात घेण्यापूर्वी मीर उस्मान अली खान यांनी १९११ ते १९४८ पर्यंत हैदराबादवर राज्य केले.
-
हैदराबादमध्ये विविध प्रकराची विकास कामे केल्यामुळे उस्मान अली खान यांना आधुनिक हैदराबादचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते. उस्मानिया विद्यापीठ, उस्मानिया जनरल हॉस्पिटल आणि हैदराबाद उच्च न्यायालय ही याची काही उदाहरणे आहेत. हैदराबादमधील जवळजवळ सर्व सार्वजनिक इमारती त्यांच्या कारकिर्दीत बांधल्या गेल्या आहेत.
-
उस्मान अली खान बहादूर १९३७ मध्ये टाईम मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकले होते. त्यावेळी टाईम मासिकाने त्यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, असा उल्लेख केला होता.
-
उस्मान अली खान बहादूर यांनी त्यांच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत, हैदराबाद संस्थनात वीज आणली, रस्ते आणि हवाई मार्गांसह रेल्वे मार्ग विकसित केले होते.
-
उस्मान अली खान यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक शैक्षणिक सुधारणा आणल्या. निजामाच्या बजेटपैकी सुमारे ११ टक्के रक्कम शिक्षणावर खर्च केली जात असे.
-
१९४७ मध्ये त्यांनी राणी एलिझाबेथ यांना लग्नाची भेट म्हणून एक मुकुट आणि एक हार भेट दिला होता. राणी अजूनही या भेटवस्तूतील ब्रूचेस आणि हार घालतात आणि त्यांना हैदराबादचा निजाम हार म्हणून ओळखले जाते. (सर्व फोटो सौजन्य: सोशल मीडिया.)

शनीच्या कृपेने कोणत्या राशीला आज लाभेल धनलाभाची संधी? वाचा मेष ते मीनचे शनिवार विशेष राशिभविष्य